आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा दाखल:क्रिकेट मॅचवर सुरू असलेल्या सट्ट्यावर धाड ; सोळा हजार रुपयांचा माल जप्त

खामगाव3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारत-पाकिस्तान क्रिकेट मॅच वर सुरू असलेल्या सट्टयावर अप्पर पोलिस अधीक्षक यांच्या पथकाने धाड टाकून सोळा हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला असून जागा मालकावर गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई २८ ऑगस्ट रोजी करण्यात आली आहे.अप्पर पोलिस अधीक्षक पथकाचे पोहेका गजानन बोरसे यांना शहरातील मोठा क्रिकेट सट्टा चालवणारा सटोडी हा लासूरा येथे बसून आशिया कप मधील भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात सुरू असलेल्या टी २० क्रिकेट सामन्यावर मोबाइल द्वारे सट्टा लाइन घेऊन लोकांना मोबाइलवरून भाव देऊन पैशाचे हार जीत वर मोबाइलच्या साह्याने क्रिकेट सट्टा खेळत असल्याची माहिती मिळाली.

या माहिती वरून पथकाने सापळा रचला. त्यानंतर पथकाने लासुरा येथे जाऊन शिवलाल जवंजाळ यांच्या घरातील एका खोलीत सुरू असलेल्या क्रिकेट सट्ट्यावर धाड टाकून रामा लाहुडकार रा.गोपाल नगर खामगाव याच्या ताब्यातून एक मोबाइल व चार साधे मोबाइल एक हिशोब चिट्ठी व इतर साहित्य असा एकूण १६ हजार ६०५ रूपयांचा माल जप्त केला आहे. या प्रकरणी जागा मालक शिवलाल जवंजाळ व रामा लाहुडकार यांचे विरुद्ध शेगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलिस अधीक्षक यांचे आदेशाने पोलिस उपनिरिक्षक पंकज सपकाळे, पोहेका गजानन बोरसे, नापोका संदीप टकसाळ, पोका राम धामोडे, महिला पोलिस कर्मचारी अनिता गायकी यांनी केली आहे.

बातम्या आणखी आहेत...