आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा:वरली मटका जुगारावर छापा; एकाविरुद्ध गुन्हा

बुलडाणा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

वरली मटका जुगारावर पोलिसांनी छापा टाकला असता जुगार खेळताना व खेळवताना मिळून आल्याने पोलिसांनी पंचासमक्ष एकाविरुद्ध गुन्हा नोंदवला. आरोपीकडून जुगार साहित्यासह ९९५ रुपये जप्त करण्यात आले.

देऊळगाव राजा येथील जुनी नगर पालिका चौकात वरली मटका जुगार खेळला जात असल्याची माहिती पोलिसांना गुप्त माहितीदाराकडून मिळाली. यावरून पोलिसांनी पंचासमक्ष छापा टाकून आरोपीकडून जुगार साहित्य व ९९५ रुपये रोख जप्त करण्यात आले. सरकारतर्फे नापोका सुनील खरात यांच्या फिर्यादीवरून शेख युसूफ शेख कादर (४६) रा. संजय नगर याच्याविरुद्ध मुंबई जुगार कायद्यान्वये गुन्हा नोंदवण्यात आला. तपास बीट जमादार नायबराव मोगल करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...