आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासिंधुदुर्ग कणकवली चौंडेश्वरी सांस्कृतिक भवन येथे २२ ते २४ जून दरम्यान राज्यस्तरीय १८ व्या युथ मुलींच्या बॉक्सिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते .यामध्ये बुलडाणा जिल्हा बॉक्सिंग संघटने अंतर्गत आरती रमेश खंडागळे हिने ५० ते ५२ किलो वजन गटात चमकदार कामगिरी करुन कांस्य पदक पटकाविले. आरतीने लोणार तालुक्यातील मांडवा गावाची मान उंचावली आहे. यावेळी बॉक्सिंग संघटना राज्य उपाध्यक्ष भरत कुमार वावळ यांच्या हस्ते मेडल, प्रमाणपत्र देऊन तिचा सन्मान करण्यात आला.
ऑलम्पिक मधील बॉक्सिंग हा एक महत्त्वाचा खेळ आहे या खेळामध्ये सुद्धा ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबातील मुली सुद्धा कमी राहिल्या नाहीत असे आरती खंडागळे हिने दाखवून दिले .बीबी येथील वसंतराव नाईक महाविद्यालयात १२ वी विज्ञान शाखेत शिकत असताना कोरोनाच्या संसर्गामुळे शाळा, कॉलेज बंद असताना पी .यु .राठोड यांच्या मार्गदर्शनातून तिने शेगाव येथील संकेत धामंदे कोच यांच्याकडे प्रशिक्षण घेतले.
सिंधुदुर्ग येथे झालेल्या राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेत पहिल्यांदाच अमरावती विभागातून मुलींमधून आरती खंडागळे हिने विभागातून कांस्य पदक पटकावल्यामुळे आरतीचे सर्वत्र कौतुक होत आहे. यशाचे श्रेय तिने काेच संकेत धामंदे व .ना. विद्यालयाचे शिक्षक, आई, वडील, यांना दिले आहे . यावेळी बॉक्सींग संघटनेचे जिल्हाध्यक्ष विठ्ठल लोखंडकार, उपाध्यक्ष निलेश इंगळे , कोषाध्यक्ष डॉ. संतोष आंबेकर,सचिव राज सोळंकी , सिद्धार्थ सरकटे, प्रवीण राठोड तसेच संघटनेचे सर्व पदाधिकारी यांनी आरतीला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.