आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मागणी:वायझडी धरणातून गौण खनिजांची राजरोस चोरी; संतोष बनसोडे यांची तहसीलदारांकडे तक्रार

चिखली20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरालागतच्या वायझडी धरणाच्या काठावरील शेलुद शिवारातील गट क्रमांक ५९ मधील गौण खनिजाची राजरोस चाेरी करण्यात येत आहे. दरम्यान, काही अज्ञात चोरटे रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत मुरूमाची मोठ्या प्रमाणात चोरी करत असल्याने त्यांच्यावर त्वरित कारवाई करण्यात यावी, अशी मागणी संतोष बनसोडे यांनी तहसीलदारांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

मागील काही दिवसांपासून शहर परिसरातील गौण खनिजांचे अवैधरीत्या उत्खनन करण्यात येत आहे. रात्री बारा वाजेनंतर काही गौण खनिज चोरटे विना नंबरचे जेसीबी, टिप्पर, ट्रॅक्टर आणून शहराजवळील शेलुद गट नंबर ६९ मधील मुरूम खोदून नेत आहेत. मागील पंधरा दिवसांपूर्वी याबाबतची माहिती तहसीलदारांना दिली असता त्यांनी मात्र त्यावर कुठलीच कारवाई केली नाही. दरम्यान ८ जून रोजी रात्रीचा फायदा घेऊन अज्ञात व्यक्तीने मुरूम चोरून नेला आहे. वायझडी धरणाशेजारी काही शेतकऱ्यांना धरणामध्ये विद्युत पंप टाकण्यासाठी गुंठे पद्धतीने जमीन दिलेली आहे. त्या जागा खोदून अज्ञात चोरटे मुरूम चोरी करत असल्याने मोठमोठे खड्डे पडले आहे. आगामी काळात धरणाचे पाणी परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतात घुसून त्यांचे मोठे नुकसान होऊ शकते.

बातम्या आणखी आहेत...