आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन जयंती:थोडगे स्मृतिप्रीत्यर्थ आदर्श शिक्षक पुरस्काराने रमेश टेंभेकर सन्मानित

राळेगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील झाडगाव येथील श्री लखाजी महाराज विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात सोमवार, दि. ५ सप्टेंबर रोजी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती साजरी करण्यात आली. या वर्षी विद्यालयातर्फे अध्यायनाचे गुणदान करून,त्यांचे सर्व परी मुल्यमापन पाहता विद्यालयातून ज्येष्ठ शिक्षक रमेश टेंभेकर यांना बाबूसाहेब थोडगे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ मुकुंदराव थोडगे यांचेकडून विद्यालयाचे अध्यक्ष दिलीप कोल्हे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

या कार्यक्रमात सर्वप्रथम आज सर्व वर्गातील इच्छुक विद्यार्थी शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांना संधी देण्यात आली. त्याचप्रमाणे विद्यालयाचे मुख्याध्यापक, चतुर्थ श्रेणी कर्मचारी यांची सुध्दा निवड करण्यात आली. या एकदिवसीय शिक्षकांनी आपल्या तासिका घेऊन विद्यार्थ्यांना अध्यायनाचे धडे दिले. तर कायमस्वरूपी शिक्षकांनी या एकदिवसीय शिक्षकांचे अध्यायनाचे मुल्यमापन करून त्यांना वस्तू स्वरूपी भेट देऊन त्यांना प्रोत्साहित केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे अध्यक्ष दिलीप कोल्हे, प्रमुख पाहुणे संस्थेचे उपाध्यक्ष आशिष कोल्हे, संचालक सुरेश गंधेवार, शेखरराव झाडे, गुलाबराव महाजन, भरत पाल, मुख्याध्यापक विलास निमरड तर आजचे आदर्श शिक्षक सत्कार मुर्ती रमेश टेंभेकर उपस्थित होते. या कार्यक्रमात सर्वप्रथम सावित्रीबाई फुले व डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी टेंभेकर यांच्या कार्याची प्रशंसा करून भविष्यात अशाप्रकारे कार्य करणाऱ्या शिक्षकांना अशाच प्रकारे पुरस्कृत केले जाईल असे सूतोवाच केले. त्यानंतर विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक दिगंबर बातुलवार, कुंदा काळे यांचे सुध्दा भाषण झाले. सोबतच रंजय चौधरी शुभेच्छा दिल्या व आजच्या तीन शिक्षकांची नावे जाहीर केली.

सोबतच संस्थेचे उपाध्यक्ष आशिष कोल्हे यांनी सुध्दा मार्गदर्शन केले. सोबतच शिक्षकांना व विद्यार्थ्यांना शिक्षकदिनाच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे शेवटी कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा संस्थेचे अध्यक्ष दिलीप कोल्हे यांनी संस्थेच्या होणाऱ्या विकासकामांची माहिती दिली. या कार्यक्रमाला विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक श्रावणसिंग वडते, दिगांबर बातुलवार, रंजय चौधरी, कुंदा काळे, वाढोणकर, राजेश भोयर, मोहन आत्राम, स्वाती नैताम, मोहन बोरकर, विशाल मस्के, वैशाली सातारकर, कोल्हे, अश्विनी तिजारे, रोहोणकर तर शिक्षकेतर कर्मचारी वाल्मीक कोल्हे, पवन गिरी, शुभम मेश्राम, बाबूलाल येसंबरे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे संचालन सातारकर तर उपस्थित मान्यवरांचे आभार वडते यांनी मानले.

बातम्या आणखी आहेत...