आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाईट कृत्य:विवाहितेचा विनयभंग, बोराखेडी पोलिसांत रात्री उशिरा गुन्हा दाखल

मोताळा6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

एका सत्तावीस वर्षीय विवाहितेचा वाईट उद्देशाने हात पकडून विनयभंग केल्याची तसेच विवाहितेच्या सासूला ब्लेड मारून जखमी केल्याची घटना ४ ऑगस्ट रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास घडली आहे. प्रकरणी विवाहितेच्या तक्रारीवरून बोराखेडी पोलिसांत रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एक २७ वर्षीय विवाहिता ही ४ ऑगस्ट रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास आपल्या घरासमोर उभी होती. दरम्यान, गावातीलच शिवाजी सोमनकर याने येवुन विवाहितेस वाईट उद्देशाने जवळ येण्याचा हाताने इशारा केला. त्यावर मला का बोलावले असे विचारण्यासाठी विवाहिता गेली असता शिवाजी सोमनकर याने विवाहितेचा वाईट उद्देशाने हात धरून ओढत असताना विवाहितेची सासू केशरबाई त्याठिकाणी आली. सासूने आपल्या सुनेस त्याच्या तावडीतून सोडवण्याचा प्रयत्न केला असता सोमनकर याने हातातील ब्लेड सासु केशरबाईच्या डोळ्यावर मारले. त्यामध्ये केशरबाई जखमी झाली. पुढील तपास सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक भगवान पारधी व पोकॉ ज्ञानेश्वर धामोडे हे करीत आहेत.

बातम्या आणखी आहेत...