आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रम संस्कार:विदर्भ महाविद्यालयात रासेयो शिबिर‎

बुलडाणा‎19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील विदर्भ महाविद्यालयाच्या रासेयो‎ श्रम संस्कार शिबिराचे उद्घाटन २८‎ फेब्रुवारी रोजी जांभरुण येथील गट‎ ग्रामपंचायत मध्ये करण्यात आले.‎ यावेळी उद्घाटक म्हणून अंधश्रद्धा‎ निर्मूलन समिती चिखलीचे अध्यक्ष‎ किशोर वाघ हे होते. तर चंचल‎ चाकणकर, संस्थाध्यक्षा शारदा पवार‎ प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या.‎

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.‎ लक्ष्मण फुलचंद शिराळे हे होते. .‎‎‎‎‎‎‎ उद्घाटन प्रसंगी चंचल चाकणकर यांनी‎ रासेयो स्वयंसेवकांचा व्यक्तिमत्व विकास‎ होण्याबाबत मार्गदर्शन केले. त्यानंतर‎ रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ. संगीता‎ पवार यांनी मार्गदर्शन करीत शिबिराचे‎ महत्त्व पटवून दिले. त्यानंतर प्राचार्य डॉ.‎ एल. एफ. शिराळे यांनी स्वयंसेवकांना‎‎‎‎‎‎‎ महत्वाचे मार्गदर्शन केले.‎ कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक‎ नीलेश राऊत यांनी तर प्रास्ताविक प्रा.‎ वैभव वाघमारे यांनी केले. कार्यक्रमाला‎ प्रा. सीमा काळणे, गाडेकर, स्वयंसेवक‎ विद्यार्थी व विद्यार्थिनी व शिक्षकेतर‎ कर्मचारी उपस्थित होते.‎

बातम्या आणखी आहेत...