आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराविवेकानंद आश्रम व्दारा संचालित विवेकानंद विज्ञान महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे शिबिर ग्राम देऊळगाव माळी येथे सुरू झाले असून या शिबिराचे उद्घाटन आश्रमाचे उपाध्यक्ष अशोक थोरहाते यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून देऊळगाव माळीचे ग्रा.पं.चे उपसरपंच रंगनाथ चाळगे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष गजानन गाभणे, केंद्र प्रमुख के.सी.काळे, मुख्याध्यापिका विजया जगधाने, प्रा.जयप्रकाश सोळंकी तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आश्रमाचे सचिव संतोष गोरे हे होते. कार्यक्रमाची सुरूवात दीप प्रज्वलन व प्रतिमेचे पूजन करू झाली. प्रास्ताविक प्रा.अमोल शेळके यांनी केले. अध्यक्षीय भाषणातून गोरे यांनी रासेयो ही विद्यार्थ्यांनी सशक्त पिढी घडवण्याचे माध्यम आहे. विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे, काटकसरीचे, श्रमाचे व मर्यादीत गरजांचे संस्कार आवश्यक असल्याचे सांगितले. महात्मा गांधी, स्वामी विवेकानंद, शुकदास महाराज, गाडगे महाराज हे दैदिप्यमान व्यक्तिमत्वे अत्यंत स्वावलंबी होती. स्वतःची कामे स्वतः करणे हा पुरूषार्थ आहे.
मर्यादीत गरजा ठेवणे व निसर्गाचा कमीत कमी उपभोग घेणे हे मानवतेचे लक्षण आहे. आज अमर्यादीत गरजा, साधन संपत्तीचा अतिवापर यामुळे पुढील पिढ्यांना हे सुंदर जग प्राप्त होण्यासाठी सगळ्यांनी प्रयत्नशील राहावे लागणार आहे. ग्रामीण भागातील जीवनशैली निसर्गाला पुरक आहे. मानव धर्माचे प्रतिबिंब ग्रामीण जगण्यातून स्पष्ट दिसते. त्यांच्यासाठी त्यांचे कष्ट कमी होण्यासाठी तरुणांनी आपल्या बौध्दिक सामर्थ्याचा वापर करावा, असे आवाहन केले. स्वागत गीत ॠतुजा इंगळे हीने तर सूत्रसंचालन वैशाली नागरे, दर्शन शेळके यांनी तर आभार प्रदर्शन प्रा.मधुरा सातपुते यांनी केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.