आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकऱ्यांत जातीचे विष कालवण्याचे काम:शेतकरी हीच आमची जात, रविकांत तुपकर यांची केंद्र सरकारवर टीका

16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

रासायनिक खतासाठी शेतकऱ्यांना जात विचारून शेतकऱ्यांत जातीचं आणि धर्माचं विष पेरण्याचं काम केंद्र सरकार करतंय अशी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी केली आहे.

शेतकऱ्यांत जातीचे विष कालवण्याचे काम

रासायनिक खतांच्या खरेदीसाठी केंद्र सरकारने आनलेल्या ई-पॉस मशीन मध्ये शेतकऱ्यांना आता जातीचा उल्लेख करावा लागणार आहे. हे अत्यंत दुर्दैवी आहे. हे महाराष्ट्राच्या भूमिकेला साजेसे नाही. छत्रपती शिवरायांनी जातीपातीच्या पलिकडे जाऊन स्वराज्यात सोन्याचं शिवार पिकवलं. हे सरकार त्यांचा एकही गुण न घेता फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन राजकारण करत आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयाचा तीव्र निषेध रविकांत तुपकरांनी केला आहे.

हा शिवछत्रपतींचा महाराष्ट्र

हा महाराष्ट्र शिवछत्रपतींचा महाराष्ट्र आहे. सगळ्या जाती-धर्मातल्या मावळ्यांना घेऊन शिवछत्रपतींनी स्वराज्याची स्थापना केली होती. हे सरकार शिवछत्रपतींचं नाव घेऊन सत्तेवर आलं होतं. मात्र शिवाजी महाराजांच्या विचारांच्या विपरित वागण्याचं काम हे सरकार करत आहे. जातीधर्मात विष कालवण्याचं काम करत आहे.

जात विचारून शेतकऱ्याला अपमानित करण्याचे काम

एक तर शेतमालाला भाव सरकार देत नाही. दुसरीकडे त्याची जात विचारून त्याला अपमानित करण्याचं काम सरकार करत आहे. शेतकऱ्याला कुठलीच जात नसते. शेती हा आमचा धर्म आहे आणि शेतकरी हीच आमची जात आहे. त्यामुळे या पुढे शेतकऱ्यांना त्या कॉलममध्ये जातीचा उल्लेख करायला लावला, तर हे आम्ही कदापिही खपवून घेणार नाही. केंद्राच्या या निर्णयाविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटना रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही असे रविकांत तुपकर यांनी म्हटले आहे.

ही बातमीही वाचा...

... जात विचारून शेतकऱ्यांना खते काय देताय:शेतकरी हीच आमची जात; अजित पवार जातीच्या राजकारणावरुन सभागृहात आक्रमक

बातम्या आणखी आहेत...