आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पवित्रा:रविकांत तुपकरांचा महावितरण विरोधात आक्रमक पवित्रा

बुलडाणा12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळालेल्या, नादुरुस्त विद्युत रोहित्रांमुळे वीजपुरवठा होत नसल्याने रब्बीच्या हंगामात पाणी देता येत नाही. १५ दिवस, महिना - महिना रोहित्र मिळत नाही त्यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. ही समस्या लक्षात घेऊन रविकांत तुपकर यांनी जळालेल्या रोहित्रांच्या दुरुस्तीसाठी १९ नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेसहा वाजता आक्रमक भूमिका घेत चिखली मार्गावरील मेंटेनन्स विभागात ठिय्या मांडून मुक्काम आंदोलन सुरु केले आहे. शेतकऱ्यांना विद्युत रोहित्र मिळेपर्यंत येथून हलणार नाही, अशी भूमिका रविकांत तुपकर यांनी घेतली आहे.

ऐन रब्बी हंगामातच विद्युत रोहित्र वारंवार जळतात आणि ते त्यांच्या दुरुस्तीसाठी महिना - महिना वाट पहावी लागते. नियमानुसार आवश्यक ती रक्कम भरुन, सर्व बिले भरूनही विद्युत रोहित्र मिळत नाही, शेतकरी वारंवार चकरा मारुनही त्यांना विद्युत रोहित्र दिले जात नाही. अधिकारी उडवा-उडवीची उत्तरे देतात. कार्यकारी अभियंता, उपअभियंता कार्यालयात बसत नाही, शेतकऱ्यांना भेटत नाही त्यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. शेतकऱ्यांकडून वारंवार येणाऱ्या तक्रारी पाहता रविकांत तुपकर यांनी १९ नोव्हेंबर रोजी सायंकाळी शेतकऱ्यांना घेऊन चिखली रोडवरील मेंटेनन्स विभागात धडक दिली

बातम्या आणखी आहेत...