आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपाेषणास:पालिकेतील रिक्त पदे भरण्यासाठी अनुकंपाधारकांच्या उपाेषणास सुरुवात

बुलडाणा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर पालिकेतील रिक्त पदे तातडीने भरून त्यामध्ये अनुकंपाधारकांचा समावेश करण्यात यावा, या मागणीसाठी अनुकंपाधारकांनी गुरुवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास सुरूवात केली आहे.

जिल्हाधिकऱ्यांना दिलेल्या निवेदनानुसार जिल्ह्यातील नगर पालिकेत विविध संवर्गाची अनेक पदे रिक्त आहेत. या रिक्त पदांवर अनुकंपाधारकाची नियुक्ती करावी, यासाठी अनेकवेळा निवेदन व अर्ज सादर केले आहेत. परंतु प्रशासनाने कारवाई न करता बिंदू नामावली मंजूर केली नाही. दोन-तीन महिन्यांपूर्वी पालिका प्रशासनाने बिंदू नामावली मंजूर करून रिक्त जागेचा अहवाल नगर विकास मंत्रालयास सादर केला आहे.

नियुक्ती बाबत अनुकंपाधारकांनी वारंवार विचारणा केली असता येत्या काही दिवसातच जागा भरण्यात येतील, असे सांगण्यात आले. परंतु अद्यापही नियुक्ती देण्यात आली नाही. नगर विकास मंत्रालयावरही याचा कुठलाच परिणाम झाला नाही. त्यामुळे रिक्त पदे तातडीने भरून अनुकंपाधारकांचा समावेश करण्यात यावा, या मागणीसाठी अनुकंपाधारकांनी उपोषणास सुरूवात केली आहे. आंदोलनात सुनील इरतकर, अक्षय जाधव, संदेश वाघोदे व पवन मुकने यांनी सहभाग घेतला आहे.

बातम्या आणखी आहेत...