आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करावारसदारांना डावलून नियमबाह्य जमिनीची नोंद करून ती विकल्या प्रकरणी विकत घेणाऱ्या व्यक्तीवर कायदेशीर कारवाई करण्यासाठी रंजना श्रीकुमार खरात व श्रीकुमार खरात रा. बुलडाणा यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमाेर बेमुदत उपोषणास सुरुवात केली आहे. निवेदनात नमुद आहे की, बुलडाणा नगर पालिका हद्दीतील मलकापूर रोडवरील १० एकर ३२ गुंठे जमिनीपैकी वारसाहक्काने आलेली जमिनी २०१६ -१७ मध्ये वारसदाराच्या कुठल्याही सह्या न घेता बुलडाणा येथील तलाठी, आर आय, नायब तहसीलदार यांच्या सहकार्याने सहायक निबंधकाला हाताशी धरुन विक्री करण्यात आली आहे. मलकापूर येथील लोकांनी ही जमीन विकत घेतली असून तेथे प्लॉट पाडणे सुरु केले आहे.
तरी सदर शेती खरेदी प्रकरणात संबधित तत्कालीन सहायक निबंधक, तलाठी, मंडळ अधिकारी, नायब तहसीलदार यांची चौकशी करुन कडक कार्यवाही व्हावी. वडिलोपार्जित जमिनीचा हक्क किंवा मोबदला वारसदार या नात्याने देण्यात यावा. यापुर्वी नायब तहसीलदार गृह विभाग यांचे लेखी आश्वासनामुळे उपोषण तात्पुरते थांबवले होते. मात्र प्रशासनाने कोणतीही कार्यवाही न केल्याने पुन्हा उपोषण सुरु करत असल्याचे निवेदनात नमुद आहे. या उपोषणाचा आजचा दुसरा दिवस होता.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.