आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निर्णयाचे स्वागत:सोयाबीनवरील निर्बंध उठवल्याने दिलासा

बुलडाणाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

सोयाबीन वरील निर्बंध शासनाने नुकतेच उठवले आहेत. त्‍यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून येत्‍या काळात सोयाबीनला चांगलाच भाव मिळणार असल्याचे चित्र आहे. केंद्र शासनाच्या या निर्णयाचे शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी स्वागत केले.जिल्हयात परतीच्या पावसाने सोयाबीन व कापसाचे प्रचंड नुकसान केले. परतीच्या पावसाने नगदी पीक समजल्या जाणाऱ्या सोयाबीनचा दर्जा या पावसामुळे खालावू शकतो, जो माल शेतकऱ्यांच्या पदरात पडणार आहे त्‍याला काही चांगला भाव मिळणार नाही ही बाब शेतक-यांना माहित असल्याने शेतकरी वर्ग हवाल दिल झाला होता.

दुसरीकडे तेलबिया व सोयाबीन वर शासनाने सातत्‍याने निर्बंध टाकल्याने सोयाबीनची मागणी घटली होती. यामुळे शेतकऱ्यांना कमी भावात सोयाबीन विकावे लागत होते. शासनाच्यावतीने या निर्बधाला अनेक वेळा मुदत वाढ देण्यात आली होती. शेवटची मुदत वाढ डिसेंबर पर्यंत देण्यात आली होती.

शेतकऱ्यांना कुठे तरी न्याय मिळावा ही सदभावना ठेवून आ. संजय गायकवाड यांनी शासन व केंद्र शासनाकडे सातत्याने मागणी लावून धरली होती. त्‍यानुशंगाने शेतक-यांना दिलासा देण्यासाठी केंद्र शासनाने तेलबिया व सोयाबीन वरील निर्बंध उठविले. त्या‍मुळे व्यापारी आता खरेदी कडे वळतील. मोठया प्रमाणात सोयाबीनची खरेदी केली जाईल. मागणी वाढल्याने सोयाबीनचे भाव चांगलेच मिळणार असल्याने शेतक-यांना दिलासा मिळणार आहे. त्‍यामुळे आमदार संजय गायकवाड यांनी सदर केंद्र शासनाच्या निर्णयाचे स्वागत केले आहे.

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री शेतकऱ्यांच्या पाठीशी
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर उठसूठ आंदोलन करणारे शेतकऱ्यांची दिशाभूल करत आहेत. केंद्र व राज्य शासन हे शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे संवेदनशील आहेत.-आ. संजय गायकवाड, बुलडाणा

बातम्या आणखी आहेत...