आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

युवा स्वातंत्र्य ज्योत रॅली:क्रांतिकारकांच्या त्यागाची जाण ठेवावी ; नरेश शेळके

बुलडाणा3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करताना क्रांतिकारकाच्या त्यागाची जाण ठेवावी असे मत यशवंतराव चव्हाण सेंटरचे जिल्हा केंद्र सचिव नरेश शेळके यांनी १४ ऑगस्ट रोजी युवा स्वातंत्र्य ज्योत रॅली प्रसंगी केले आहेत. अध्यक्षस्थानी डॉ.इंदुमती लहाने यांची उपस्थिती होती. जिल्हा केंद्राच्या वतीने अंत्रीतेली येथील शिवराज शिक्षण संस्थेच्या वतीने युवा स्वातंत्र्य ज्योत रॅलीचे आयोजन केले जाते. यावेळी इंदुमती लहाने यांनी युवकांच्या कर्तव्याची जाणीव करुन देत स्वातंत्र्य वीरांनी भोगलेल्या यातनांची जाणीव करुन दिली.

यावेळी प्रा.अंजली गाढे, पी.एम.जाधव, विजया कोळसे, निर्मला तायडे, अनुजा सावळे, समित सरदार यांनी समयोचित भाषणे केली. यावेळी रॅलीमध्ये माजी कृषी सभापती लक्ष्मी शेळके, शंकर महाराज, संतोष पाटील, सत्तार भाई, नाझीमा, मंगला वायाळ, सतीश उबाळे, महेंद्र सौभागे, संदीप तायडे, सुनील सोनुने, डॉ.अर्चना टेकाळे, अनिल रिंढे, प्रा.दीपक आमले, राजू गवई, डॉ. ज्ञानेश्वर गावंडे, बाळासाहेब येसकर, अनिल कोळसे, नीलेश पडोळ, गजानन भिवसनकर यांची उपस्थिती होती.

बातम्या आणखी आहेत...