आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दूरवस्था:शेगाव-नागझरी रस्त्याची दूरवस्था; पावसाचे पाणी घुसले शेतात

शेगाव2 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

दोन जिल्ह्याच्या सिमेवर असलेल्या शेगाव ते नागझरी या रस्त्याची मोठ्या प्रमाणावर दुरावस्था झाली आहे. परिणामी या रस्त्याचे पाणी शेजारील शेतकऱ्यांच्या शेतात घुसले आहे. त्यामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. याला सर्वस्वी प्रशासन जबाबदार असल्याचा आरोपी शेतकरी करीत आहेत.

दोन जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या शेगाव नागझरी या रस्त्याची मागील अनेक वर्षापासून प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे दुरावस्था झाली आहे. आषाढी एकादशीनिमित्त शहरातून श्री संत गजानन महाराजांची पालखी ज्या मार्गाने पंढरपूर कडे जात असते, त्या शेगाव नागझरी रस्त्याची पालखी जाण्यापूर्वी तरी दुरुस्ती होईल असे वाटत होते. परंतु ठेकेदाराकडून थातूरमातूर अर्ध्या रस्त्याचे डांबरीकरणाचे काम करण्यात आले.

दरम्यान ६ जून रोजी श्रींची पालखी या मार्गावरून पंढरपूरकडे रवाना झाल्यानंतर केवळ दिखाव्यासाठी झालेले रस्त्याचे काम पहिल्याच पावसात वाहून गेले आहे. २२ जून रोजी दुपारच्या वेळी शहरासह परिसरात दीड तास झालेल्या पावसामुळे या रस्त्याचे नदी मध्ये रूपांतर झाले होते. या रस्त्याचे पाणी शेतात गेल्यामुळे शेतीचे सुद्धा अतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे अगोदरच आर्थिक संकटात सापडलेला शेतकरी अधिकच हतबल झाला आहे.

बातम्या आणखी आहेत...