आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअमरावती पदवीधर मतदार संघाची निवडणूक घोषित झाली असून राजकीय पक्षांची भूमिपूजन, उद्घाटनांची फलके शहरातून काढून टाकावीत अशी सूचना जिल्हाधिकारी ह. पी. तुम्मोड यांनी निवडणूक विभागाला दिली आहे. ५ जानेवारीला निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध होत असून नामनिर्देशन पत्रह स्वीकारण्यास ही सुरुवात होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी तुम्मोड यांनी दिली. जिल्हाधिकारी यांचे कक्षात बुधवारी अमरावती पदवीधर मतदार संघांच्या निवडणुकीबाबत पत्रकार परिषद घेण्यात आली.
यावेळी ते बोलत होते. निवडणुक अधिकारी गौरी सावंत यांची यावेळी उपस्थिती होती. यावेळी ते म्हणाले की,नामनिर्देशन पत्र दाखल करण्याचा अखेरची तारीख १२ जानेवारी असून छाननी १३ जानेवारी रोजी होणार आहे. अर्ज मागे घेण्याचा दिनांक १६ जानेवारी आहे. मतदान ३० जानेवारी रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत ठेवण्यात आली आहे. मतमोजणी २ फेब्रुवारी रोजी होणार आहे. निवडणुक प्रक्रिया ४ फेब्रुवारी रोजी पुर्ण होणार आहे. या निवडणुकी दरम्यान कोविड १९ च्या नियमांचे पालन करण्यात येणार आहे.
या निवडणुकीसाठी २२ भाग ठेवण्यात आले आहे. ज्यामध्ये चिखली तालुक्यात अमडापूर, मेहकर तालुक्यात डोणगाव, जानेफळ, वि.नगर, देऊळगाव राजा तालुक्यात देऊळगाव मही, सिंदखेड राजा तालुक्यात दुसरबीड, साखरखेर्डा , मोताळा तालुक्यात धामणगाव बढे, बुलडाणा तालुक्यात धाड ही गावे तहसील स्तराव्यतिरिक्त ठेवण्यात आली आहे. जेणेकरुन या भागातही मतदानाची सुविधा असणार आहे. एकुण मतदार संख्या ३६४९७ इतकी आहे. एकुण पुरुष मतदार २६१६१ असुन महिला मतदार १०३३६ इतकी आहे.
असे आहेत मतदार संख्या
मलकापूर २२०४, जळगाव जामोद २२८७, संग्रामपूर १०४२, शेगाव २५६२, धामणगाव बढे३८७, मोताळा १११३, बुलडाणा ६३६६, धाड ५५९, अमडापूर १५६, चिखली ४०३२, मेहकर २०४४, डोणगाव ७३९, जानेफळ ५१५, वि.नगर ३४७, देऊळगाव मही ४४५, देऊळगाव राजा १३३०, सिंदखेड राजा ५३३, दुसरबीड ३९२, साखरखेर्डा ४१९, लोणार १५२६
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.