आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

त दररोज दुचाकीचे अपघात:‘मेहकर ते चिखली रस्त्यावरील खड्ड्यांची तत्काळ दुरुस्ती करा’; खड्डे चुकवण्याच्या नादात दररोज दुचाकीचे अपघात घडत आहेत

मेहकर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मेहकर ते चिखली रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांची तत्काळ दुरुस्ती करण्यात यावी, अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा डॉ. ज्ञानेश्वर टाले यांनी आज सोमवारी दिला आहे. मेहकर ते चिखली मार्गाची खस्ता हालत झाली असून या रस्त्यावर मोठ-मोठे खड्डे पडले आहेत. खड्डे चुकवण्याच्या नादात दररोज दुचाकीचे अपघात घडत आहेत.

या अपघातात काहींना आपले जीव गमवावे लागले असून काहींना गंभीर दुखापत होऊन अपंगत्व आले आहे. तसेच या रस्त्यावर कुठेही वाहने उभी केली जातात. वाहतूक पोलिस पेट्रोलिंग करत नसल्यामुळे कोणीही आपल्या मर्जी प्रमाणे नियम मोडत रस्त्यावर वाहने उभी करतात. त्यामुळे तीन दिवसांआधी नागझरी येथे दोन युवकांचा जीव गेला आहे. रस्ता सुरक्षा समितीने तातडीने बैठक घेऊन होणारे अपघात टाळण्यासाठी कृतीशील कार्यक्रम तयार करावा व तशा सूचना संबंधित अधिकारी व प्रशासनाला द्याव्यात, जेणे करुन या रस्त्यावर वाढणाऱ्या अपघातांचे प्रमाण कमी होईल व प्रवाशांना जीव गमवावा लागणार नाही. प्रशासनाने याची दखल घ्यावी, अन्यथा आंदोलन करू, असा इशारा डॉ.ज्ञानेश्वर टाले यांनी प्रशासनाला दिला आहे.

बातम्या आणखी आहेत...