आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासतत वाढत जाणाऱ्या महागाईमुळे सर्वसामान्य जनता त्रस्त असताना जनतेला पुन्हा महागाईच्या खाईत लोटण्याचा निर्णय घेतला आहे. १८ जुलैपासून आता अनेक दैनंदिन वस्तूंसाठी नागरिकांना जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. आजवर करमुक्त असलेल्या स्थानिक डेअरी आणि कृषी उत्पादने यावर देखील जीएसटी लादण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे महागाईत वाढ होणार असल्याने ही अवाजवी दरवाढ रद्द करण्यात यावी, या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
जीएसटी कौन्सिलच्या ४७ व्या बैठकीनंतर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी १८ जुलैपासून काही नवीन उत्पादने आणि काही वस्तू व सेवांवरील जीएसटीची दर वाढ जाहीर केली आहे. या बैठकीत स्थानिक डेअरी आणि कृषी उत्पादने यावर पाच टक्के दर वाढ होणार आहे. सरकारने आणलेली ही दरवाढ आणि त्यात समाविष्ट केलेल्या वस्तू यामुळे गोरगरिबांना अधिकच हालअपेष्टा सहन कराव्या लागणार आहेत. सीएनजी आणि पीएनजी यांची झालेली दरवाढ त्वरीत कमी करण्यात यावी, जगात सर्वात जास्त गॅस सिलिंडरचे भाव भारतात वाढलेले आहेत. त्यामुळे गृहिणींचे बजेट कोलमडले आहे.
तरी त्वरित गॅस सिलिंडरचे भाव कमी करून केलेली दरवाढ मागे घ्यावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आली आहे. निवेदनावर वंचितचे जिल्हाध्यक्ष गणेश चौकसे, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष विशाखा सावंग, तालुकाध्यक्ष प्रभाकर वरखेडे, संघपाल जाधव, नितीन सूर्यवंशी, बाळू मोरे, दादाराव हेलोडे, रमेश गवारगुरु, चंद्रकांत टेरे, संजय दाभाडे, जे.के. रणीत यांच्यासह अनेकांच्या सह्या आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.