आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाहणी‎:सिंदखेडराजा येथील ऐतिहासिक वास्तूची‎ अभ्यासक दुधाने यांनी केली पाहणी‎

बुलडाणा‎24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे येथील इतिहास अभ्यासक‎ दुधाने यांनी रविवार, दि.५ मार्च रोजी‎ सिंदखेड राजा येथील ऐतिहासिक‎ वास्तूची पाहणी करून‎ शिलालेखाचे वाचन केले.‎ राजे लखुजीराव जाधव व‎ जाधव कालीन १६ व्या शतकातील‎ महाराष्ट्रातील देशातील पुरातन‎ शिलालेख वाचन करून त्याचा‎ अभ्यास करून मराठी भाषेत त्याचे‎ भाषांतर करून ते मांडण्याचे काम‎ पुणे येथील इतिहास अभ्यासक तथा‎ इतिहास संशोधक अनिल दुधाने हे‎ करीत आहेत.

दरम्यान,‎ सिंदखेडराजा येथे येऊन त्यांनी‎ येथील ऐतिहासिक वास्तूची पाहणी‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ केली व सिंदखेडराजा येथील राजे‎ लखुजीराव जाधव कालीन अनेक‎ शिलालेखाचे वाचन केले. याप्रसंगी‎ त्यांच्यासोबत राजे देशमुख जाधव,‎ सुभाष राजे जाधव, प्रा.गोपाल राजे‎ जाधव, प्रवीण राजे जाधव, विकी‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ राजे जाधव, राहुल राजे जाधव,‎ आकाश राजे जाधव तसेच‎ त्यांच्यासोबत सिंदखेडराजा येथील‎ जिजाऊ भक्त सुमित खांदवे‎ पाटील, मयुरेश खेकाळे, लक्ष्मीकांत‎ जावळे आदी उपस्थित होते.‎

बातम्या आणखी आहेत...