आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापंचायत समितीच्या सन २०२२ च्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आठ गणासाठी आरक्षण सोडत २८ जुलै रोजी तहसील कार्यालयाच्या सभागृहात काढण्यात आली. उपविभागीय अधिकारी वैशाली देवकर, तहसीलदार सिद्धेश्वर वरणगावकर यांच्या प्रमुख उपस्थितीत ही सोडत काढण्यात आली.
पंचायत समिती मधील आठ गणासाठी आरक्षण काढण्यात आले आहे. त्यामध्ये टुनकी बु. सर्वसाधारण, सोनाळा सर्वसाधारण, बावनबिर मागास प्रवर्ग महिला, वरवट बकाल अनुसूचित जमाती महिला, कवठळ नागरिकांचा मागास प्रवर्ग, पळशी झाशी सर्वसाधारण महिला, वानखेड अनुसूचित जाती, पातुर्डा बुद्रुक सर्व साधारण महिला अशी सोडत जाहीर करण्यात आली आहे. यावेळी निवडणूक विभागातील कर्मचारी, राजकीय पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. अशी माहिती निवडणूक विभागातील ठाकरे यांनी दिली. ही सोडत जाहीर होताच विविध चर्चांना उधाण आले होते. तर इच्छुकांची नाराजी स्पष्ट जाणवत होती. जि.प.च्या चार गणाचे आरक्षण जाहीर सोनाळा नामाप्र, बावनबीर सर्वसाधारण महिला, पातुर्डा सर्वसाधारण व पळशी झाशी अनुसूचित जाती महिलांसाठी आरक्षित करण्यात आले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.