आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Akola
  • Buldhana
  • Reservoirs Overflow, Less Disease; The People Will Remain Stress Free, But Due To The Destruction Of Fodder, The Cloud Of Crisis Falls On The Cattle Owners |marathi News

शुभवर्तमान:जलाशये तुडुंब, रोगराई होणार कमी; जनता राहणार तणावमुक्त, वैरणाचा नाश झाल्याने गुरे मालकांवर मात्र संकटाचे ढग

जळगाव जामोद16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील भेंडवळ येथे अक्षय तृतीयेच्या दिवशी मांडलेल्या घट मांडणीचे भाकीत बुधवारी ४ मे रोजी वर्तवण्यात आले. या भाकितानुसार जून महिन्यात सर्वसाधारण पाऊस पडणार असून नंतर मात्र पाऊस चांगला राहणार असल्याने जलाशये तुडुंब भरलेले राहणार आहे. पिकांमध्ये खरिपात तूर, कापूस तर रब्बी मध्ये गहु, हरभरा ही पिके चांगली राहणार आहेत. मात्र वैरणाचा नाश होणार असल्याने गुरे मालकांवर संकटच येणार आहे. यंदा मात्र रोगराई कमी होणार असल्याचा दिलासा या भाकितातून चंद्रभान महाराज यांचे नववे वंशज सारंगधर महाराज व पुंजाजी महाराज यांनी भेंडवळच्या भाकिताद्वारे दिला आहे.

अक्षय तृतीयेच्या दिवशी वीस फूट भिजेचे वर्तुळामध्ये जागा आखणी करुन मध्यात दीड बाय दोन फूट खाली खड्डा करुन त्या खड्ड्यात चार मातीचे ढेकळे ठेऊन त्यावर पाण्याची घागर, त्यावर सांडई, कुरडई, वडा, भजा, पापड, करंजी, पुरी ठेवतात. खड्ड्यातील पानावर लाल सुपारी ठेवतात तर विशिष्ट अंतरावर अठरा धान्य गोलाकार पद्धतीने ठेवली जाते. त्यानंतर या मांडणीची पाहणी करुन भाकीत वर्तवले जाते. गेल्या तीनशे ते साडेतीनशे वर्षापुर्वी चंद्रभान महाराज यांनी ही मांडणी सुरु केली होती. त्यांना पक्ष्यांची भाषा येत होती. त्यांनी ही मांडणीच सुरु केली.

मागील वर्षी सांगण्यात आलेले भेंडवळचे भाकीत खरे ठरले
राजा कायम राहणार आहे. मात्र देशात घुसखोरीचे प्रमाण वाढणार असून राजा भोवती अडचणी वाढणार आहेत. वर्ष हे आर्थिक मंदीचे राहणार असल्याने अर्थव्यवस्था डबघाईस येणार आहे. पर्जन्यमान ठीक असून पाणी टंचाई जाणवणार नाही. रोगराई कायमच राहणार आहे. हे भाकित बहुतांशी खरे ठरले होते. कापसाचे पीक, ज्वारी, मूग, गहू, हरबरा ही पिके सर्वसाधारण राहणार आहे. तुरीचे पीक कमी प्रमाणात होणार आहे तर तिळाचे पीक चांगले राहणार आहे. अशी पिक परिस्थिती वर्तवण्यात आली होती. जून महिन्यात सार्वत्रिक पाऊस नसून कमी अधिक प्रमाणात काही भागात पडणार आहे. जुलै महिन्यात सार्वत्रिक व जास्त प्रमाणात पाऊस पडेल, ऑगस्ट महिन्यात पाऊस चांगला राहील, सप्टेंबर महिन्यात पाऊस कमी असून काही भागात पावसाची आवश्यकता भासणार आहे. जवळपास ९९.९९ टक्के पाऊस मागील वर्षी पडला होता.

पावसाचे असे आहे भाकित
जून महिन्यातील पाऊस हा कोठे कमी तर कोठे जास्त स्वरुपाचा राहणार आहे. जुलै महिन्यात पाऊस कमी संभवतो तर ऑगस्ट महिन्यात चांगला पाऊस होण्याचे संकेत आहे. सप्टेंबर महिन्यात भरपूर पाऊस होणार असल्याने जलाशये तुडुंब भरतील. येणारे वर्ष हे पीक पाणी चांगले राहुन साथीचे रोग नाहीत.

असे असेल आगामी वर्ष
भादली हे रोगराईचे प्रतीक समजतात. भादलीचा एकच दाना बाहेर आल्याने रोगराई म्हणजेच साथीच्या रोगावर नियंत्रण राहील. तूर, मूग, उडीद, तीळ चारही बाजूने पसरलेले होते. त्यामुळे तेलवानाचे पीक चांगले राहील. बाजरीचे पीक सर्वसाधारण राहील. मठ सर्वसाधारण तर जवस, लाख, वटाणा यांचे पीक सर्वसाधारण राहील. तर गहू व हरभरा यांचे दाणे किंचित बाहेर पसरलेले असल्याने रब्बीचे हे पीक चांगले राहील. करडीचे दाणे कायम असून हे सैन्याचे प्रतीक समजतात म्हणजे सुरक्षा चांगली राहील. मसूर म्हणजे शत्रू समजतात. मसूरचा दाणा आतल्या बाजूला पसरलेले असल्याने घुसखोरी सारखे त्रास देणारे प्रकार सुरुच राहतील. पुरी, वडा, भजा हे सतत गेल्या तीन वर्षांपासून गायब होत असल्याने नैसर्गिक कोप राहणार असल्याचे दर्शविते. तर करंजीही जागेवर नसल्याने आर्थिक टंचाई जाणवणार आहे.

बातम्या आणखी आहेत...