आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजीनामा:चंद्रकांत पाटील यांचा राजीनामा घ्या : शिवसेना

लोणार4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी महापुरुषांबद्दल केलेल्या वक्तव्याचा स्थानिक उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने निषेध करण्यात आला आहे. पाटील यांचा त्वरित राजीनामा घ्यावा, अशी मागणी पदाधिकाऱ्यांनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे

पैठण येथील एका कार्यक्रमात चंद्रकांत पाटील यांनी महापुरुषांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले. भाजपचे काही लोक हेतूपुरस्सर आमच्या आराध्य दैवतांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करून त्यांचा अवमान करत आहेत, असे या निवेदनात नमूद केले आहे. भाजपचे नेते राम कदम यांनी शिवसैनिकांना घरात घुसून मारण्याची धमकी दिल्याने त्यांचाही निषेध करत असल्याचे नमूद केले आहे. भाजपच्या लोकांमध्ये महापुरुषांचा अवमान करण्याची स्पर्धा महाराष्ट्रात लागली असल्याचे वाटत आहे. चंद्रकांत पाटील यांच्यावर शाई फेकणाऱ्यावरील गुन्हे शासनाने त्वरित मागे घ्यावेत, अशी मागणीही निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदन देताना शिवसेना शहरप्रमुख गजानन जाधव, शहर उपप्रमुख शाम राऊत, विनायक मापारी, कैलास आंभोरे, सुदन अंभोरे, तानाजी मापारी, शेख लुकमान, सचिन कापुरे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...