आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खामगाव:खामगाव टॅलेंट सर्च स्पर्धा परीक्षेला विद्यार्थ्यांचा प्रतिसाद

खामगाव16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा परीक्षेविषयी जागृती निर्माण व्हावी, त्यांनी शालेय शिक्षणापासूनच आपले ध्येय निश्चित करून त्या दिशेने वाटचाल करावी, त्यांच्यामध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी या उद्देशाने स्थानिक सु.रा.मोहता महिला महाविद्यालया द्वारे आयक्युएसी अंतर्गत टॅलेंट सर्च स्पर्धा परीक्षांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत १ हजार १० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.

टॅलेंट सर्च स्पर्धेचे तीन ग्रुप तयार करण्यात आलेले असून अ गटात महाविद्यालयीन विद्यार्थी ब गटात कनिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थी व क गटात माध्यमिक विद्यालयीन विद्यार्थीनी सहभाग नोंदवला. ही स्पर्धा तालुक्यातील शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकरिता आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेमध्ये एकूण १ हजार १० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. या स्पर्धेत प्रत्येक गटामधून प्रथम द्वितीय व तृतीय येणाऱ्या विद्यार्थ्यांना अनुक्रमे ५ हजार १ रुपये, ३ हजार १ रुपये व २ हजार १ रुपये रोख पारितोषिक, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.

या स्पर्धेचा निकाल ९ मे रोजी जाहीर करण्यात येणार आहे. या स्पर्धेचे आयोजन महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ.स्वाती चांदे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ.विष्णू घुमटकर यांनी केले. स्पर्धेच्या आयोजनाकरीता आयक्युएसी समन्वय डॉ.राजेंद्र वाघमारे, तसेच कला व वाणिज्य विभागातील प्राध्यापक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.

बातम्या आणखी आहेत...