आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मॅरेथॉन स्पर्धा आयोजित:व्यापारी संघटनेतर्फे आयोजित मॅरेथॉन स्पर्धेला प्रतिसाद; आग्रा येथील आसिफ खान ठरला विजेता

जळगाव जामोद3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृत वर्षानिमित्त व मेजर ध्यानचंद यांच्या जयंती निमित्त साजरा होणाऱ्या राष्ट्रीय खेळ दिवसाचे औचित्य साधून मी धावतो देशासाठी, देशाच्या अखंडतेसाठी व एकात्मतेसाठी या संकल्पनेनुसार येथील व्यापारी संघटनेच्या वतीने मॅरेथॉन स्पर्धा आयोजित केली होती.२७ ऑगस्ट रोजी सकाळी नऊ वाजता स्पर्धेला सुरूवात करण्यात आली होती. या स्पर्धेचा प्रवेश अर्ज गुगलवर ऑनलाइन असल्याने विनाशुल्क ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत नागपूर, नासिक, अकोला, संभाजीनगर, उत्तर प्रदेश, छत्तीसगड, जळगाव खान्देश अशा विविध ठिकाणच्या २१२ स्पर्धकांनी भाग घेतला होता.

स्पर्धेचे पंच म्हणून प्रवीण डाबरे, प्रमोद येऊल, दीपक देशमुख, राऊत यांनी काम पाहिले. या स्पर्धेतील प्रथम क्रमांक पटकावणारा आसिफ खान हा ठरला आहे. त्याने बारा मिनिट ४६ सेकंदात अंतर पार केले. तर द्वितीय क्रमांक भूपेंद्रसिंह नाशिक व तृतीय बक्षीस सुनील कुमार रा. नाशिक, चौथे बक्षीस प्रदीप दलासिंह राजपूत रा. संभाजीनगर व पाचवे बक्षीस दीपक सोमवाणी राहणार दीपनगर अकोला यांना देण्यात आले. तर यामध्ये झोपे सर हे सेवानिवृत्त शिक्षकाने स्पर्धेत भाग घेतल्याने सर्वात वयस्कर स्पर्धक म्हणून त्यांना गौरवण्यात आले. ठाणेदार सुनील अंबुलकर यांनी स्पर्धेच्या नियोजनाबद्दल संघटनेचे कौतुक केले. स्पर्धेसाठी व्यापारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.

बातम्या आणखी आहेत...