आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराविश्व हिंदू परिषद, बजरंग दलाच्या वतीने शौर्य दिनाचे औचित्य साधून शहरातील गणपती मंदिर येथे सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत रक्तदान शिबिराचे आयोजन केले हाेते. या शिबिराला शहरातील युवक व महिला वर्गाचा प्रतिसाद मिळाला. शंभरच्या जवळपास दात्यांनी रक्तदान केले. रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांना प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. यवतमाळ येथील एकनिल रक्तपेढीने रक्त संग्रहित केले.
या रक्तदान शिबिराला किशोर घेरवरा व पवन शेबे यांचे विशेष सहकार्य लाभले. रक्तदान शिबिरासाठी दिनेश कोठारी, धनंजय बलखंडे, अक्षय ठाकरे, अक्षय डेहणकर, करण कोलेकर, राहुल निरडवार, मयूर गोहेल, आकाश चंदन, दुर्गेश इरवे, पीयूष दोषी, आकाश निमकर, यश चिरडे, करण दुधे, दीपक बांबल, हर्ष घेरवरा, ऋषी ठाकूर, सौरव गवई, उज्वल कांबळे आदींनी परिश्रम घेतले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.