आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:धुक्यातली हिरकणीला प्रतिसाद; स्वातंत्र्यासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या १५ स्त्रियांना मानवंदना

बुलडाणा3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अखिल भारतीय साहित्य परिषद बुलडाणा व गर्दे वाचनालय बुलडाण्याच्या वतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त “धुक्यातली हिरकणी“ या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. याला रसिकांनी प्रतिसाद दिला. इतिहासातील दुर्लक्षित परंतु देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या १५ स्त्रीयांना मानवंदना देऊन त्यांची ओळख समाजाला व्हावी. यासाठी त्यांच्या भूमिकेत बुलडाणा येथील लेखिका अर्चना देव यांच्या संकल्पनेतून हा खास आगळा वेगळा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गर्दे वाचनालय अध्यक्ष गोकुल शर्मा, उद्घाटक म्हणून जिजामाता कॉलेजचे प्रा. डॉ. श्रीराम येरणकर हे होते तर प्रमुख उपस्थिती चित्तरंजन राठी, रा.से.संघ तथा उपाध्यक्ष बाबा वरणगांवकर व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी भारत मातेचे पुजन तथा दीपप्रज्वलन करण्यात येऊन मान्यवरांचा स्वागत करण्यात आले. या कार्यक्रमात प्रमुख भूमिका भीमाबाई होळकर यांचे भुमिका वर्षा पाथरकर, कुमारी मैनाची भूमिका बागेश्री कुळकर्णी, भोगेश्वरी फुकनची भूमिका विनया चौधरी, राजमाता द्रौपदी बाईची भूमिका मीना कुळकर्णी, कालीबाईची भूमिका उर्वी देशपांडे, राणी गिडालूची भूमिका सुवर्णा देशमुख, झलकारीची भूमिका गौरी देशपांडे, उज्ज्वला मुजुमदारची भूमिका गौरी अहीर, सुशीला दिदीची भूमिका शुभांगी जोशी, राणी तपस्विनीची भूमिका नीता देशपांडे, अजिजनची भूमिका प्रज्ञा कुळकर्णी, उदादेवी तापसीची भूमिका प्रज्ञा कुळकर्णी, अवंतिका बाई लोधोची भूमिका सागरिका देशपांडे व नीरा आर्यची भूमिका अर्चना देव यांनी यांनी साकारली होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आशुतोष वाईकर यांनी तर प्रास्ताविक अर्चना देव यांनी केले व आभार प्रदर्शन दीपाली देशपांडे यांनी केले.

बातम्या आणखी आहेत...