आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करालव्ह जिहादच्या विरोधात व धर्मांतर विरोधी कायदा लागू करण्यात यावा, या मागणीसाठी हिंदुत्ववादी संघटनांनी आयोजित केलेल्या सकल हिंदू जन आक्रोश महामोर्चाला शहरात अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. शहरात आज दिवसभर कडकडीत बंद पाळण्यात आला. त्यामुळे शहरातील प्रमुख रस्त्यावर एकच शुकशुकाट पसरला होता. मागील अनेक दिवसांपासून शहर व तालुक्यात हिंदू धर्मीयांच्या विरोधात सुनियोजित पद्धतीने लव्ह जिहादचा कट रचून हिंदू मुलींना जाणीव पूर्वक लक्ष केल्या जात आहे. मागील पंधरा दिवसात अशा लागोपाठ तीन घटना घडल्या आहेत. त्यामुळे सकल हिंदू समाजात तीव्र संतापाची भावना निर्माण झाली आहे. या घटनांचा निषेध करण्यासाठी आज ४ मार्च रोजी शहरात कडकडीत बंद पाळुन जन आक्रोश महामोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.
भाजपा नेते तथा माजी आमदार चैनसुख संचेती यांच्या नेतृत्वात नांदुरा खुर्द येथील जबलेश्वर मंदिर येथून मोर्चाला सुरुवात करण्यात आली. या मोर्चात भाजपचे सुधीर मुर्हेकर, तालुकाध्यक्ष संतोष मुंढे, बलदेवराव चोपडे, शिवाजी पाटील, राम झांबरे, शिवचंद्र तायडे, शैलेश मीरगे, ब्रम्हानंद चौधरी, प्रमोद हिवाळे, बजरंग दलाचे अँड अमोल अंधारे, पिंटू धोरण, गजानन डीवरे, शिवसेना शहर प्रमुख अनिल जांगडे, श्याम राखोंडे, मनसेचे भागवत उगले, महिला आघाडीच्या अर्चना पाटील, सारिका डागा, मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब चांभारे, कोळी महासंघाचे जिल्हाध्यक्ष पहाडसिंग सुरळकर, शिवसेना महिला आघाडीचा सरिता बावस्कर, प्रज्ञा तांदळे यांच्यासह भाजप, शिवसेना, मनसे, बजरंग दल, विहीप, आरपीआय आठवले गट यासह हिंदू समाजातील तब्बल दहा हजारांहून अधिक महीला, नागरिक या मोर्चात सहभागी झाले होते.
व्यावसायिकांचाही चांगला प्रतिसाद
लिव्ह जिहादच्या विरोधात आज शहरात पाळण्यात आलेल्या बंदला व्यावसायकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. शहरातील शाळा, महाविद्यालये, भाजीपाला विक्री, मद्य विक्री या सह अन्य दुकाने सकाळ पासुनच बंद ठेवण्यात आली होती. त्यामुळे शहराच्या प्रमुख मार्गांवर शुकशुकाट दिसून आला होता. काळी पिवळी वाहने व ऑटो देखील बंद ठेवण्यात आले होते. दवाखाने, मेडिकल आणि बँका मात्र सुरू होत्या.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.