आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बस साठी निवेदन:खामगाव-ढोरपगाव बस पूर्ववत सुरू करा; सरपंचासह ग्रामस्थांचे निवेदन

खामगावएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

मागील काही वर्षापासून खामगाव ते ढोरपगाव ही बस फेरी बंद असल्यामुळे विद्यार्थी व नागरिकांचे हाल होत आहेत. आता शाळा, महा विद्यालयांसह सर्व शिक्षण संस्था सुरु झाल्या आहेत. परंतु, बसेस बंद असल्यामुळे विद्यार्थ्यासह सर्वांना त्रास होत आहे. विद्यार्थ्याची हेळसांड थांबवण्यासाठी खामगाव-ढोरपगाव बस सेवा पूर्ववत सुरू करण्यात यावी, अशी मागणी सरपंचासह ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे आगार प्रमुखांकडे केली आहे. बस सेवेबाबत २१ जून रोजी सरपंच सुनीता धुरंधर व पत्रकार संतोष धुरंधर यांनी आगार प्रमुख आर. यू. पवार यांची भेट घेवून त्यांना बस सुरू करण्यासाठी ग्रामपंचायतीचा ठराव व निवेदन दिले. यावेळी पवार यांनी २८ जून पासून ढोरपगाव बस फेरी पूर्ववत सुरु करण्याचे आश्वासन दिले. यावेळी सरपंच सुनीता धुरंधर, संतोष धुरंधर, ग्रामपंचायत सदस्या अंजना माटे, रामभाऊ टिकार, पत्रकार महेंद्र सावंग, मोहन माटे, शुध्दोधन धुरंधर, गोकुळ बहुरुपे, संतोष इंगळे आदी उपस्थित होते.