आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जल्लोषात स्वाग:सेवानिवृत्त नायक राहुल खराटे यांचे‎ केनवड येथे जल्लोषात स्वागत‎

केनवड2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय सैन्यातून नुकतेच सेवानिवृत्त‎ झालेले नायक राहूल मनोहर खराटे यांचे मायभूमी‎ केनवड नगरीत आगमन होताच जल्लोषात स्वागत‎ करण्यात आले. माजी सरपंच मनोहर पाटील खराटे‎ यांचे कनिष्ठ चिरंजीव राहुल हे २००६ मध्ये सैन्यात‎ रुजू झाले होते. त्यांनी जबलपुर, अंबाला, रांची,‎ सागर (म. प्र.), गंगानगर, अंभोर, पानगड आदी‎ ठिकाणी सेवा बजावली.

तरुणांना सैन्यात दाखल‎ होण्यासाठी त्यांनी प्रेरित करीत मार्गदर्शन केले.‎ त्याकरिता त्यांना वडील मनोहर खराटे, स्व. ताईबाई‎ खराटे, ज्येष्ठ बंधू रवींद्र खराटे, किरण खराटे यांचे‎ त्यांना पाठबळ मिळाले. गावात दाखल होताच‎ नायक राहुल खराटे यांचे श्रीक्षेत्र संतवन येथे शाम‎ महाराज खराटे व समितीच्या वतीने स्वागत‎ करण्यात आले. त्यानंतर गावातून भव्य मिरवणूक‎ काढण्यात आली. दरम्यान त्यांनी छत्रपती शिवाजी‎ महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे‎ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.‎

बातम्या आणखी आहेत...