आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कामकाजाचे कौतुक:जिल्हा रुग्णालयाचा आरोग्य उपसंचालकांकडून आढावा ; विविध उपक्रमांची घेतली माहिती

बुलडाणा6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला येथील आरोग्य सेवा उपसंचालक डॉ. तरंग तुषार वारे यांनी २९ जुलै रोजी बुलडाणा जिल्हा रुग्णालय येथे भेट देऊन रुग्णालयाच्या कामकाजाचा आढावा घेतला. दरम्यान कामकाजाची पाहणी करून रुग्णालयातील कामकाजाचे कौतुक केले.या वेळी उपसंचालक डॉ. वारे यांनी जिल्हा रुग्णालयातील विविध विभाग, डायलिसिस विभाग, आंतर रुग्ण विभाग, आयसीयू विभाग अशा वेगवेगळ्या विभागांना भेटी देऊन कामाची पाहणी करून कामाबाबत समाधान व्यक्त केले. तसेच जिल्हा रुग्णालय येथे चालणाऱ्या विविध उपक्रमाबाबत माहिती घेतली. रुग्णालयातील रुग्णांशी डॉ. वारे यांनी भेटी घेत संवाद साधला. भेटीप्रसंगी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नितीन तडस, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत पाटील, डॉ. भागवत भुसारी, निवासी बाह्यसंपर्क अधिकारी डॉ. यास्मिन चौधरी, मुख्य प्रशासकीय अधिकारी अनिल बांगर, डॉ. सचिन वासेकर, वैद्यकीय अधीक्षक जिल्हा स्त्री रुग्णालय व विविध विभागाचे वैद्यकीय अधिकारी व रुग्णालयातील कर्मचारी यांची उपस्थित होती.

बातम्या आणखी आहेत...