आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रस्ताव:समिती सभागृहात विविध विभागांच्या आढावा; जिल्ह्यातील शासन स्तरावर प्रलंबित विषयांचे प्रस्ताव सादर करावे

बुलडाणा2 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यातील विविध विषय मंत्रालय स्तरावर शासनाकडे प्रलंबित असतात. अशावेळी पालक सचिव संबंधित विभागांच्या राज्य स्तरावरील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी समन्वय ठेवून प्रलंबित विषय मार्गी लावतात. त्यामुळे जिल्ह्यातील प्रलंबित विषयांचे शासन स्तरावर प्रस्ताव सादर केले नसल्यास ते तातडीने सादर करावे, अशा सूचना मृद व जलसंधारण विभागाचे सचिव तथा जिल्ह्याचे पालक सचिव डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी आज गुरुवारी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समिती सभागृहात विविध विभागांच्या आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी पालक सचिव यांनी आढावा घेत उपरोक्त सूचना दिल्या. बैठकीला जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती, अप्पर जिल्हाधिकारी धनंजय गोगटे उपस्थित होते. जिल्ह्यातील कोविड लसीकरणातील दुसऱ्या डोसचे प्रमाण वाढवण्याचा सूचना करीत ते म्हणाले की, दुसरा डोस वाढवण्यासाठी प्रयत्न करावे. कोविडच्या दुसऱ्या लाटेत जीवितहानी जास्त झाली.

या लाटेचा धडा घेत यंत्रणेने सज्ज असावे. कोरोना अजून गेलेला नाही, त्यानुसार नियोजन असावे. सिंचन विभागाने सुप्रमासाठी अर कचेरी, आलेवाडी या लघु पाटबंधारे प्रकल्पांच्या शासन स्तरावर सादर केलेल्या प्रस्तावाबाबत पाठपुरावा करावा. जिल्हा परिषद जलसंधारण व राज्याच्या जलसंधारण विभागाने अमृत सरोवर योजना विहीत मुदतीत पूर्ण करावी. या योजनेंतर्गत जिल्ह्यात ७८ अमृत सरोवर करण्यात येणार आहे. या सरोवरांचे जिओ टॅगिंग करावे असे सांगून ते पुढे म्हणाले की, जलशक्ती अभियान प्रभावीपणे राबवावे.

या अभियानांतर्गत राबवलेल्या विविध उपक्रमांची माहिती नॅशनल पोर्टलवर भरण्यात यावी. जलशक्ती अभियानात नागरिकांचा सहभाग घेवून जलजागृती करण्यात यावी. यावेळी पालक सचिव यांनी समृद्धी महामार्ग, आरोग्य विभाग, मनरेगा, सिंचन प्रकल्प, मातोश्री पाणंद रस्ते योजना, सामाजिक वनीकरण, महावितरण, पुरवठा विभाग, पुनर्वसन, कृषि, जलसंधारण, समाज कल्याण, पशुसंवर्धन, पिक कर्ज वाटप, परिवहन विभाग, उत्पादन शुल्क विभागांचा आढावा घेतला. बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गिते यांनी माहितीचे सादरीकरण केले.

बातम्या आणखी आहेत...