आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पैसे जाहीर:जिल्ह्याची सुधारीत पीक पैसेवारी 53 पैसे जाहीर

बुलडाणाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्याची सुधारीत पीक पैसेवारी जिल्हाधिकारी यांनी जाहीर केली आहे. त्यानुसार जिल्ह्याची पीक पैसेवारी ही आता ५३ पैसे झाली आहे. सन २०२२-२३ या खरीप हंगामातील जिल्ह्यातील एकूण १ हजार ४१९ गावांमध्ये ४८३ गावांची सुधारीत पीक पैसेवारी पन्नास पैशांच्या आत आणि ९३६ गावांची सुधारीत पीक पैसेवारी पन्नास पैशांच्या वर जाहीर करण्यात आली आहे.

तालुक्यातील एकूण गावे आणि तालुकानिहाय प्रसिद्ध झालेली पीक पैसेवारी पुढीलप्रमाणे आहे. बुलडाणा तालुका ९८ गावे ५९ पैसे, चिखली १४४ गावे ४८ पैसे, देऊळगाव राजा ६४ गावे ४८ पैसे, मेहकर १६१ गावे ४७ पैसे, लोणार ९१ गावे ५५ पैसे, सिंदखेड राजा ११४ गावे ४८ पैसे, मलकापूर ७३ गावे ६२ पैसे, मोताळा १२० गावे ५६ पैसे, नांदुरा ११२ गावे ५३ पैसे, खामगाव १४५ गावे ५६ पैसे, शेगाव ७३ गावे ५४ पैसे, जळगाव जामोद ११९ गावे ५८ पैसे, संग्रामपूर १०५ गावे ५१ पैसे याप्रमाणे १ हजार ४१९ गावांची सुधारित पैसेवारी ५३ पैसे जाहीर करण्यात आली आहे. यामुळे दुष्काळी सवलती मिळण्यास अडचणी येतील.

बातम्या आणखी आहेत...