आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवेदन:बेकायदेशीर केलेले निलंबन मागे घ्या ; मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेची मागणी

यवतमाळ3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

संघटनेचे सभासद तसेच ढाणकी येथील सहाय्यक अभियंता योगेश ठाकरे यांचे बेकादेशिररित्या केलेले निलंबन रद्द करण्यात यावे या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेच्या वतीने मंडळ कार्यालय येथे द्वार सभा घेवून अधीक्षक अभियंता यांना निवेदन दिले.

ढाणकी येथील सहाय्यक अभियंता योगेश ठाकरे यांनी पुसद विभागात तसेच जिल्ह्यात उत्कृष्ठ कामगीरी केली आहे. त्याबद्दल प्रादेशिक संचालकाकडून गौरविण्यात सुद्धा आले आहे. असे असतांना कंपनीच्या नियमानुसार त्यांची बाजु प्रशासनासमोर मांडण्याकरिता कोणत्याही प्रकारची संधी न देता प्रशासनाने कार्यालयीन आदेशानुसार तडकाफडकी निलंबनाची एकतर्फी कार्यवाही केलेली आहे. त्यामुळे संघटनेच्या सभासदावर अन्याय झालेला असुन कंपनीच्या कार्यपद्धतीवर बगल देण्यात आलेली आहे. त्यामुळे संघटनेच्या वतीने मंडळ कार्यालया येथे द्वार सभा घेवून प्रशासनाने योगेश ठाकरे यांचे बेकायदेशीर रीत्या केलेले निलंबन त्वरीत रद्द करून त्यांना कामावर घेण्यात यावे.

या मागणीचे निवेदन कार्यकारी अभियंता यांना दिले. तसेच कामावर न घेतल्यास औद्योगिक कलह कायदा १९४७ चे अधिन राहून संविधानक मार्गाने आंदोलनात्मक भुमिका घ्यावी लागेल असा इशारा देण्यात आला. यावेळी अध्यक्ष विशाल कांबळे, रसिक दुधगवळी, उमेश गावंडे, विनय आठवले, सुनिल गेडाम, आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...