आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

​​​​​​​आंदाेलन:वर्गामध्ये शिक्षकांचे फोटो लावण्याचा आदेश मागे घ्या; गुरुजींनी केला निषेध

अकाेला23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिक्षकांना वेगवेगळ्या मार्गाने शिक्षकांना अपमानित करण्यात येत असून , आमदार प्रशांत बंब यांचा वक्तव्याचा निषेध करीत महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेकडून शिक्षक दिनी साेमवारी काळ्या फिती लावून निषेध नाेंदविण्यात आला. शाळेत शिक्षकांचे छायाचित्र लावण्याचा आदेश मागे घेण्यात यावा, अशीही मागणी शिक्षकांनी केली.

शिक्षकांवर शाळाबाह्य कामांचे ओझे वाढतच असून, त्याचा परिणाम शिक्षणाच्या दर्जावर हाेत असल्याचे शिक्षकांचे म्हणणे आहे. केवळ िवद्यार्थ्यांना शिकवण्याचेच काम शिक्षकांकडे असावे, यासाठी शिक्षकांच्या संघटनांकडून अनेकदा विविध माध्यमातून मागणी करण्यात आली. मात्र या मागणीची दखल न घेता आता केवळ नकारात्मक दुष्टीकोन समोर ठेवून समाजामध्ये शिक्षकांची प्रतिमा जाणिवपूर्वक बदनाम करण्याचा काहींकडून प्रयत्न होत असल्याचा आराेप शिक्षकांनी केला आहे.

दरम्यान संसदेने केलेल्या कायद्याला हरताळ फासण्याचे काम कोणत्याही यंत्रणेने करु नये, अशा शब्दात साेमवारी शिक्षक सेनेने सरकारच्या कारभारावर हल्लाबाेल केला. आंदाेलनात शिक्षक सेना जिल्हाध्यक्ष देवानंद मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रमोद मोकळकर ,योगेश देवकते ,श्रावण इंगळे ,विजय भांडे, सुरेश धनी ,गजानन ठाकरे ,संतोष टाले, बाळकृष्ण डाखोरे, दिलीप खांदे ,गाणेश आढे, शाम पाठक ,सुरेश कडू, रवींद्र अडागळे यासह शिक्षक सेना महिला पदाधिकारी व शिक्षक सहभागी झाले होते.

बातम्या आणखी आहेत...