आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पडद्याआडच:तांदूळ काळाबाजार प्रकरण; दुकानदार पडद्याआडच

डोणगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पोलिसांनी नोव्हेंबर महिन्यात पकडलेल्या वाहनातील तांदूळ सार्वजनिक वितरण प्रणालीचा असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. मात्र, या तांदळाचा काळाबाजार करणाऱ्या स्वस्त धान्य दुकानदाराचा शोध अद्यापही न लागल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

डोणगावचे ठाणेदार नीलेश अपसुंदे यांनी पोलिस उपनिरीक्षक राहूल चव्हाण यांच्यासह पोलिस कर्मचाऱ्यांनी त्रिगोणी चौकाजवळ तांदूळ घेऊन जाणारा एक मालवाहू अॅपेरिक्षा पकडला. तपासणी केली असता त्यामध्ये १५ ते १७ क्विंटल तांदूळ आणि गव्हाचे तीन कट्टे आढळून आले. पकडलेल्या ३४ कट्टे तांदळाची किंमत ६१ हजार २०० रुपये, तर गव्हाची किंमत ४ हजार ८०० रुपये असल्याचे सांगण्यात आले. पोलिसांनी धान्यासह अॅपेरिक्षा असे एकूण दोन लाख ६६ हजार रुपयांचे साहित्य जप्त केले.

पकडलेल्या अॅपेरिक्षातील धान्य प्रथमदर्शनी सार्वजनिक वितरण प्रणालीचे असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले. त्यानुसार पोलिस काँस्टेबल शंकर तांबेकर यांच्या फिर्यादीवरून तांदळाची वाहतूक करणाऱ्या केनवड (ता. िरसोड, जि. वाशीम) येथील तिघांविरुद्ध दि. १९ नोव्हेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. ना. पोलिस काँस्टेबल गजानन ठाकरे यांनी या प्रकरणाचा तपास केला. दरम्यान, पकडलेला तांदूळ स्वस्त धान्य दुकानाचाच असल्याचे समोर आले आहे. मात्र, तो कोणाच्या दुकानातील आहे, याची माहिती मिळाली नाही. त्यामुळे संबंधित दुकानदाराचा शोध घेऊन त्वरित कारवाई व्हावी आणि त्याचा परवाना रद्द करण्यात यावा, अशी मागणी होत आहे.

बातम्या आणखी आहेत...