आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तांदूळ पकडला:काळ्या बाजारात विक्रीसाठी जाणारा‎ तांदूळ पकडला; पोलिसांत गुन्हा दाखल‎

साखरखेर्डा‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

येथून अवघ्या काही अंतरावर ‎असलेल्या हिवरा आश्रम येथे‎ मेहकर पुरवठा विभागाने‎ सार्वजनिक वितरण प्रणालीचा‎ काळ्या बाजारात विक्रीसाठी‎ जाणारा पन्नास क्विंटल तांदूळ ‎पकडला आहे. ही कारवाई २‎ जानेवारी रोजी सायंकाळी साडे‎ पाच वाजेच्या सुमारास करण्यात‎ आली आहे. या कारवाईमुळे स्वस्त‎ धान्याची तस्करी करणाऱ्यांमध्ये‎ एकच खळबळ उडाली आहे.‎ पुरवठा निरीक्षक गजानन‎ नंदकिशोर टेकाळे यांनी साखरखेर्डा‎ पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार एम‎ एच ३१ /सि क्यु/ ८४११ या‎ क्रमांकाचे वाहन संशयितरित्या‎‎ तांदळाची वाहतूक करत असल्याचे‎ दिसून आले.

यावेळी वाहन‎ चालकास तांदुळाची टी पी व‎ बिलाबाबत विचारणा केली असता‎ तांदूळाबाबत कोणतीही टी पी किंवा‎ बिल त्याने दाखवले नाही. शिवाय‎ तांदळाबाबत स्पष्टीकरण देवू‎ शकला नाही.‎ एवढेच नव्हे तर आपले वाहन‎ जागेवर सोडून चालकाने पलायन‎ केले. पंचासमक्ष वाहनाची तपासणी‎ केली असता त्यामध्ये सार्वजनिक‎ वितरण प्रणालीचा तांदुळ‎ असल्याचे दिसून आले. यावेळी‎ महसूल पथकाने उपरोक्त वाहन व‎ शंभर कट्टे तांदूळ असा एकुण १‎ लाख १७ हजार ५०० रुपयाचा माल‎ जप्त करण्यात आला आहे. या‎ तक्रारीवरून पोलिसांनी वाहन‎ चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला ‎.‎

बातम्या आणखी आहेत...