आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराविजेच्या कडकडाटासह वादळी पावसाला सुरुवात झाल्याने अनेक झाडे उन्मळून पडली असून काही ठिकाणी विजेच्या तारा तुटल्यामुळे वीज पुरवठा खंडित झाला होता तर सवडद लव्हाळा रोडवरील जागृत ऋषीबाबाबांचे मंदिर उध्वस्त झाले असून मूर्तीही फुटली आहे. तर साखरखेर्डा येथील भोगावती नदीच्या तीरावरील नव्याने सुरू असलेल्या पुलाच्या शेजारून वाहनांसाठी उभारलेला पर्यायी रस्ता पुन्हा वाहून गेल्याने रात्रभर अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.
दरम्यान, ठेकेदाराने पुन्हा मुरूम टाकून रस्ता केला असून तोही चिखलमय झाल्याने अरुंद असल्याने वाहनांना जीव मुठीत धरून जावे लागले . भोगावती नदीच्या तीरावर तिन कोटी रुपयांचा नवीन पुलाचे काम सुरू आहे. सदर काम स्लॅब लेव्हल पर्यंत आले मात्र त्याचे अॅप्रोल न आल्याने ठेकेदाराने परिस्थिती लक्षात घेऊन स्लॅबचे काम हाती घेतले असता पर्यायी रस्त्या खचण्याचे अडथळे येत असताना रात्रीच्या पावसात बेड वाहून गेल्याने पूलही वाहून जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. सदर पुलाच्या शेजारून निर्माण केलेला रस्ता वाहून जाण्यापूर्वीच काठावर पोलिसांना पहारा द्यावा लागतो आहे. तर दिवसा चिखलाने नदीपात्रात वाहन घसरून पडून जीवितहानी होवू शकते कारण पेरणीचे दिवस असल्याने खेड्यापाड्यातील कास्तकारांची लगबग वाढली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.