आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रास्तारोको:सिंदखेडराजात चंद्रकांत पाटील यांच्या निषेधार्थ रास्तारोको

सिंदखेडराजा4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी महापुरुषांबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याविरोधात येथील विरोधी पक्षांकडून रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. बस स्थानक चौकात झालेल्या या आंदोलनामुळे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक अर्धा तास खोळंबली होती.

राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी चंद्रकांत पाटील यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले. यावेळी जोरदार घोषणा देऊन पाटील यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अॅड. नाझेर काजी, तालुकाध्यक्ष सतीश काळे, शहराध्यक्ष सीताराम चौधरी, विजय तायडे, शिवाजी राजे जाधव, अजिम शेख, यासिन शेख, काँग्रेसचे शहराध्यक्ष सिद्धार्थ जाधव, ठाकरे गटाचे योगेश म्हस्के, हरीचंद्र चौधरी, आरेफ चौधरी, शिवा ठाकरे, संजय मेहेत्रे, नितीन शेळके यांच्यासह महाविकास आघाडीच्या अन्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

बातम्या आणखी आहेत...