आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहर व तालुका काँग्रेसच्या वतीने आज ५ ऑगस्ट रोजी शहरात रस्ता रोको करत केंद्र सरकारविरूद्ध निदर्शने करत महागाईचा निषेध करण्यात आली.आंदोलना दरम्यान काँग्रेस कार्यकर्त्यांनी केंद्र शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करून परिसर दणाणून सोडला होता. रास्ता रोको आंदोलनामुळे खामगाव-अकोट मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. त्यामुळे सर्वसामान्यांचे जीवन जगणे कठीण झाले आहे. महागाईवर नियंत्रण ठेवुन बेरोजगारी संपुष्टात आणावी, या मागणीसाठी शहर व तालुका काँग्रेसच्या वतीने आज ५ ऑगस्ट रोजी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात काँग्रेस पक्षाचे प्रदेश सचिव रामविजय बुरुंगले यांच्या नेतृत्वात खामगाव-अकोट या राज्यमहामार्गवर केंद्र सरकार विरोधात निदर्शने करत रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष शैलेंद्र पाटील, कैलाश देशमुख, दीपक सलामपुरिया, शहराध्यक्ष किरण देशमुख, केशवराव हिंगणे, अनिल सावळे, पवन पचरेवाल, चंद्रकांत माने, लक्ष्मण गवई, भिकू सारवन, दिलीप पटोकार, गोपाल कलोरे, शिवा धानोकार, यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.