आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कृषी सेवा:मोताळा येथील कृषी सेवा केंद्रात जबरी चोरी ; 3 लाख 80 हजार रुपयाचा माल केला लंपास

मोताळाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

येथील आठवडी बाजारात असलेल्या कृषी सेवा केंद्रात चोरी झाल्याची घटना आज ६ जून रोजी सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे. यावेळी अज्ञात चोरट्यांनी ३ लाख ८० हजार रुपयांचा माल लंपास केला आहे. प्रकरणी तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. येथील मुख्य मार्गावरील आठवडी बाजारात सुरेश हरिदास सदानी यांचे खते व बियाण्यांचे कृषी सेवा केंद्र नावाचे दुकान आहे. काल मध्यरात्रीचे सुमारास चोरट्यांनी त्यांच्या दुकानाचे कुलूप तोडून दुकानात प्रवेश केला. त्यानंतर दुकानातील सोयाबीन महाबीज ची एक बॅग, सोयाबीन अंकुरच्या अठरा बॅगा, सोयाबीन विक्रांतच्या सोळा बॅगा, सोयाबीन नऊ बॅग, सोयाबीन ईगल चार बॅग, राशी एक बॅग, मका नऊ बॅग, ज्वारी दहा बॅग, बीटी समृद्धी बावीस पाकीट, एन के ३० सात बॅग, तूर ३६ पाकीट, उडीद विश्वास आठ नग, राजा बी. जी. सोळा पाकीट, सत्या ५५ आठ पाकीट, अजीत बीटी दहा पाकीट, कावेरी एक पाकीट यासह इतर बियाण्यांचा माल असा ३ लाख ८० हजार रुपयांचा माल लंपास केला आहे. यावेळी श्वानाने दुकानाच्या बाजूने रस्त्याने वस्तीतून खरबडी रस्त्यापर्यंत माग घेतला. चोरटे तेथून वाहनाने पसार झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. सुरेश सदानी यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक विकास पाटील हे करीत आहेत.

बातम्या आणखी आहेत...