आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बायपास टी-पॉइंटवरील घटना:भरधाव बसची दुचाकीला धडक ; दुचाकीस्वार गंभीर जखमी, उपचार सुरू

देऊळगाव राजा3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भरधाव जाणारी बस व दुचाकीची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे. ही घटना १९ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास जालना देऊळगाव राजा बायपास टी-पॉइंटवर घडली. गंभीर जखमी दुचाकीस्वारास पुढील उपचारासाठी जालना येथे हलवण्यात आले आहे.

पुणे चिखली एम एच ४० /ए वयु /६१५९ या क्रमांकाची बस जालन्यावरुन चिखली कडे जात असताना देऊळगाव राजा बायपास टी पॉइंटवर हॉटेल वीराच्या दिशेने येणार्या एम.एच २१ /के /८२८६ या क्रमांकाच्या दुचाकीची व बसची समोरासमोर धडक झाली.

या अपघातात दुचाकीस्वार रावसाहेब पंढरीनाथ शेळके वय २८ रा. सावखेड भोई हा युवक गंभीर जखमी झाला असून त्याच्या डोक्याला व पायाला जबर मार लागला आहे. अपघात घडताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेवुन त्याला येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. परंतु त्याची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे या ठिकाणी प्रथमोपचार करून त्याला पुढील उपचारासाठी जालना येथे हलवण्यात आले आहे. वृत्त लिहीपर्यंत या अपघात संदर्भात पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली नव्हती.

बातम्या आणखी आहेत...