आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जयंती साजरी‎:संत रोहिदास महाराजांचे विचार समाजाला‎ दिशा देणारे ; सरपंच दिगंबर पिंप्राळे‎ यांचे प्रतिपादन

अकोट‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘मन चंगा तो कठौती में गंगा’ असा‎ संदेश ६०० वर्षांपूर्वी देणारे संत‎ रोहिदास महाराजांचे विचार‎ जनमाणसाला दिशा देणारे आहे,‎ असे प्रतिपादन आकोलखेडचे‎ सरपंच दिगंबर पिंप्राळे यांनी प्रमुख‎ मार्गदर्शक म्हणून बोलताना केले.‎ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी‎ सोसायटीचे संचालक डॉ. प्रभाकर‎ नगराळे होते. ज्येष्ठ नागरिक‎ राधेश्याम झाडे, सोसायटीचे‎ अध्यक्ष दादाराव तायडे, ग्रा. पं.‎ सदस्या पार्वती पदमणे, ग्रा. पं.‎ सदस्य दिनेश गाठेकर, मदन‎ सावळे, अ. जहिद अ. शहिद,‎ रामदास गव्हाळे, रंगराव गावंडे,‎ ज्ञानेश्वर देऊळकर, पोलिस पाटील‎ अमरनाथ शेगोकार, सदानंद‎‎‎‎‎‎‎‎‎‎ सिरसाट यांची या वेळी प्रमुख‎ उपस्थिती होती.‎

संत रोहिदास महाराज यांच्या‎ ६२५ व्या जयंतीचे आयोजन‎ ग्रामपंचायत कार्यालयात सकाळी‎ ११ वाजता करण्यात आले होते.‎ कार्यक्रमाच्या सुरुवातीला संत‎ रोहिदास महाराज यांच्या प्रतिमेचे‎ पूजन करुन मान्यवरांच्या हस्ते‎ हारार्पण करण्यात आले. प्रमुख‎ पाहुणे राधेश्याम झाडे व‎‎‎‎‎‎‎‎‎‎ कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. प्रभाकर‎ नगराळे यांनी संत रोहिदास महाराज‎ यांच्या जीवन कार्यावर प्रकाश‎ टाकला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन‎ आशिष गव्हाळे यांनी केले.‎ कार्यक्रमासाठी मंगेश देऊळकर,‎ गजानन तायडे, गोपाल धुळे, प्रमोद‎ खंडारे, नंदकिशोर चांदूरकर,‎ रामदास ताडे, रितेश नाथे, रामा‎ लव्हाळे, प्रविण गाठेकर, विशाल‎ खंडारे आदींनी परिश्रम घेतले.‎

बातम्या आणखी आहेत...