आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाववाढ:सालगड्याचा भाव लाखावर; बैलगाडी निगराणीसाठी महत्वाची भूमिका

खामगाव4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुढीपाडव्याला सालगडी ठेवण्याची प्रथा अनंत कालापासून चालत आली आहे. ही प्रथा आजही कायम आहे. बैलजोडीची निगराणीत महत्वाची भूमिका बजावणाऱ्या सालगड्याचे भाव लाखाच्या वर गेले आहे. त्यामुळे मध्यम शेतकऱ्यांना उत्पादनाचा खर्च वजा करुन सालगड्याचे पैसे देण्यासाठी आर्थिक कसरत करावी लागते.

कोरोना व पिकांवर येणारे नैसर्गिक संकटे यामुळे यंदाच्या खरीप हंगाम अडचणीत आला. मात्र शेतातील विहिरीत पाणी असलेल्या शेतकऱ्यांना रब्बीचा हंगाम दिलासा देणारा ठरला आहे. वाढत्या महागाईत शेतमाल मात्र उत्पादन खर्चावर आधारीत भाव मिळत नसल्याने शेती करणे अनेकदा घाटाचा सौदा होत आहे. अशा परिस्थितीत मराठी नविन वर्षात शेतकऱ्यांना सालगडी ठेवावे लागतात. बैलगाडी देखभाली करीता माणसांची आवश्यकता असल्याने शेतकऱ्यांना सालगडी ठेवणे गरजेचे झाले आहे. शेती कामासाठी ट्रॅक्टर व अन्य यंत्र उपलब्ध झाल्याने फार कमी ठिकाणी बैलजोडीचा वापर होतो. अशा परिस्थितीत बरेच शेतकरी आजही पिकांची आंतर मशागत करण्यासाठी बैलजोडीचा वापर करतात.

यावर्षी ठेवण्यात आलेल्या सालगड्याचे दर लाखाच्या वर जाऊन पोहोचले आहे. काही ठिकाणी पैशासोबत गहू देण्याची पध्दत आहे. त्यामुळे भविष्यात पिकले किंवा नापिकी झाली तरी लाख रुपयांच्यावर तरतुद शेतकऱ्यांना सालगडया करीता करुन ठेवावी लागणार आहे. परिसरातील अनेक खेडेगावात बैलजोडीचे प्रमाण कमी झालेले दिसून येत आहे. त्यामुळे भविष्यात सालगडी ठेवणे परवडणार काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे. मोठ्या शेतकऱ्यांना सालगडी ठेवणे आर्थिक दृष्टया परवडते. मात्र लहान आणि मध्यम शेतकऱ्यांना शेती पेरणी पासून काढणी पर्यंतचा खर्च पाहता सालगडी ठेवणे परवडणारे नाही. त्यामुळे मध्यम कास्तकार आर्थिकदृष्ट्या पेचात पडले आहेत.

बातम्या आणखी आहेत...