आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सामूहिक अभिवादन:नांद्राकोळी येथे संत सावता माळी यांना अभिवादन

बुलडाणा6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

ईश्वराला प्रसन्न करून घ्यायचे असेल तर योग,जप - तप, तीर्थ, व्रत वैकल्ये या साधनांची बिलकुल आवश्यकता नाही.केवळ ईश्वराचे अंतःकरणपूर्वक चिंतन हवे आहे, असे मत नांद्रकोळी येथे संत सावता माळी यांना सामूहिक अभिवादन करते वेळी उपस्थित मान्यवर यांनी काढले.

संत सावता माळी ह्यांच्या पुण्य तिथी निमित्त सर्व बहुजन बांधवांनी एकत्र येत त्यांना अभिवादन केले. यावेळी संत सावता माळी सेवाभावी ट्रस्ट चे अध्यक्ष रमेश उबाळे,नांद्रकोळी अर्बन चे संचालक विश्वंभर राऊत, उपसरपंच मनोज जाधव, सदस्य प्रकाश राऊत, कोषाध्यक्ष प्रकाश गवळी, सदस्य माधव दराखे, अमृता राऊत,शांताराम उबाळे, सतीश उबाळे, मुक्ताराम हुडेकर, राष्ट्रीय बजरंग दल तालुका अध्यक्ष विठ्ठल सोनुने, गोपाल जाधव,संजय गवळी, गणेश घोंगडे, श्रीराम जाधव, सिद्धेश्वर उबाळे, माधव गवळी, सुभाष राऊत, राजेश लहासे, दत्तात्रय राऊत,पांडू राऊत, बाबूराव राऊत,अजय जाधव,नांद्रकोळी अर्बनचे व्यवस्थापक गणेश गोरे,भारती गवळी,विष्णू राऊत यांच्यासह नागरिकांची उपस्थिती होती.

बातम्या आणखी आहेत...