आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मार्गस्थ:माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांना अभिवादन करुन पदयात्रा मार्गस्थ

धनराज ससाणे | शेगाव12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

माजी पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करुन शेगाव येथून मार्गस्थ झालेली भारत जोडा पदयात्रा खेर्डा येथे पोहोचली. या ठिकाणी राहुल गांधी यांनी एका वृध्द महिलेकडून सोयाबीन पीक, त्याचे निघणारे उत्पादन व त्यास मिळणारा भाव याची चौकशी केली. दरम्यान, ही यात्रा शनिवारी भेंडवळ येथे मुक्कामी होती. उदया (रविवारी) ती जळगाव जामोदकडे मार्गस्थ होईल. तदनंतर निमखेडी येथे कॉर्नर सभा घेतल्यानंतर ही यात्रा मध्य प्रदेशातील ‘तीनफुटी’कडे रवाना होणार आहे.

शेगाव येथे शुक्रवार, १८ नोव्हेंबर रोजी जनसमुदायाच्या साक्षीने राहुल गांधी यांची जाहीर सभा झाली. या सभेला संबोधित केल्यानंतर खा. राहुल गांधी स्थानिक गजानन दादा मार्केट यार्डात भारत जोडो पदयात्रेसह मुक्कामी होते. शनिवारी पहाटे ४.३० वाजता नेहमीप्रमाणे महापुरुष, देशभक्त उर्वरित.पान ३

दुपारच्या मुक्कामानंतर म.प्र.कडे होणार मार्गस्थ भेंडवळ येथील १९ नोव्हेंबरचा मुक्काम आटोपल्यानंतर २० नोव्हेंबर रोजी सकाळी जळगाव जामोद तालुक्यातील मडाखेड मार्गे जळगाव जामोद येथे भारत जोडो यात्रा दाखल होणार आहे. सातपुडा कॅम्प येथे दुपारचा मुक्काम आणि ३ वाजता निमखेडी मार्गे बऱ्हाणपूर (मध्य प्रदेश) दिशेने यात्रा मार्गस्थ होईल.

बातम्या आणखी आहेत...