आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

योजना:समर्थ कृषी महाविद्यालयाचा ‘एक दिवस माझ्या बळीराजासाठी’ ; विलास सातपुते यांचे मार्गदर्शन

देऊळगाव राजाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी समजून घेण्यासाठी ‘माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी’ हा उपक्रम स्थानिक समर्थ कृषी महाविद्यालयाच्या वतीने राबवण्यात येत आहे. तालुक्यातील खल्याळ गव्हाण येथील शेतकरी प्रकाश तुकाराम दंदाले यांच्या सोबत पुर्ण दिवस थांबून महाविद्यालयातील सहायक प्राध्यापक विलास सातपुते यांनी त्यांच्या अडचणी जाणून घेत योग्य ते मार्गदर्शन केले. राज्यामध्ये शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी त्यातून निर्माण होणारे नैराश्य यासंदर्भात योजना तयार करणारे व ते राबवणारे अधिकारी यांना लक्षात येणे आवश्यक आहे.

शेतकऱ्याच्या समस्या, नैराश्य व त्यातून होणाऱ्या आत्महत्या याबाबतची कारणमीमांसा देखील समजून घेणे आवश्यक आहे. त्या विषयाच्या चांगल्या प्रमाणात प्रशासनाच्या लक्षात येतील, त्याकरिता सुलभ व प्रभावी कृषी विषयक धोरण तयार करणे शक्य होणार आहे. विशेष करून मराठवाडा व विदर्भ विभागातील शेतकऱ्यांच्या नैराश्य व त्यातून उद्भवणाऱ्या आत्महत्या याबाबतची करणमिमांसा योग्य पद्धतीने होणे व ती प्रशासनाच्या लक्षात येणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी, प्रश्न प्रशासनाने समजून घ्यावेत. त्यावर कोणत्या उपाययोजना करून धोरणात्मक निर्णय घेणे आवश्यक आहे. यासाठी प्रशासनातील अधिकारी, पदाधिकारी यांना संपूर्ण एक दिवस शेतकऱ्यासोबत व्यतीत करून शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी समजून घेण्यासाठी माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी हा उपक्रम समर्थ कृषी महाविद्यालयातर्फे राबवण्यात येत असून शासन निर्णयानुसार माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी या उपक्रमासाठी प्रा. विलास सातपुते यांनी खल्याळ गव्हाण येथे जाऊन प्रकाश दंदाले या शेतकऱ्याची निवड केली. दरम्यान या शेतकऱ्यांसोबत पूर्ण दिवस थांबून शेतकऱ्यांच्या व्यथा जाणुन घेतल्या. या उपक्रमासाठी प्राचार्य नितीन मेहेत्रे यांचे मार्गदर्शन लाभले.

बातम्या आणखी आहेत...