आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फार्मसी कॉलेज:समर्थ कॉलेज ऑफ फार्मसीला यंदाचे उत्कृष्ट मानांकन प्राप्त

देऊळगाव राजाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

येथील श्री गजानन महाराज कृषी व शैक्षणिक संस्था द्वारा संचालित ‘समर्थ कॉलेज ऑफ फार्मसी’ महाविद्यालयाला शैक्षणिक सत्र २०२१-२२ च्या महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ मुंबईच्या बाह्य शैक्षणिक तपासणी समितीने केलेल्या अंकेक्षण अहवाला नुसार महाविद्यालयास उत्कृष्ट मानांकन प्राप्त झाले. शैक्षणिक सत्र २०१९-२० मध्ये स्थापन झालेल्या समर्थ कॉलेज ऑफ फार्मसी कमी कालावधीत उत्कृष्ट मानांकन मिळवणारे जिल्ह्यातील पहिलेच ठरले आहे.

शैक्षणिक दर्जा, डिजिटल कलासरूम, अद्यावत प्रयोगशाळा, सुसज्ज व संगणकीकृत ग्रंथालय, वायफाय परिसर, उच्च शिक्षित प्राध्यापक, उत्कृष्ट निकाल, महाविद्यालयाची विद्यार्थी संख्या, या सर्व बाबीची पडताळणी राज्य तंत्र शिक्षण मंडळ मुंबई यांची बाह्य शैक्षणिक तपासणी समिती अंकेक्षण अहवालात केले जाते व त्यानुसार महाविद्यालयास श्रेणी दिली जाते.

त्यानुसार समर्थ कॉलेज ऑफ फार्मसी उत्कृष्ट मानांकन प्राप्त झाले आहे ही विद्यार्थ्यांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. या सर्व बाबींमध्ये समर्थ कॉलेज ऑफ फार्मसी महाविद्यालय सदैव अग्रेसर राहील, अशी ग्वाही प्राचार्य प्रफुल्ल ताठे यांनी दिली. विभाग प्रमुख प्रा. गोपालकृष्ण सीताफळे, प्राध्यापक व इतर कर्मचाऱ्यांना संस्थाध्यक्ष देवानंद कायंदे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले आहे. तसेच संस्थेच्या सचिव नंदाताई कायंदे व इतर संचालक मंडळाचेही वेळोवेळी मार्गदर्शन लाभले आहे.

बातम्या आणखी आहेत...