आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समता परिषद:एम्पिरिकल डाटासाठी समता परिषदेची निदर्शने ; ओबीसी बांधवांनी सहभाग घेतला

लोणार10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

ओबीसीचा इम्परिकल डाटा सदोष पद्धतीने करण्यात यावा, या मागणीसाठी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद व ओबीसी विभाग समता परिषदेच्या वतीने १७ जून रोजी सकाळी अकरा वाजता येथील तहसील कार्यालयासमोर निदर्शने करून तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.

बाठिया आयोग ओबीसीचा इम्पिरिकल डाटा चुकीच्या पद्धतीने संकलित करीत आहे. त्यामुळे ओबीसीचे पिढ्या पिढ्यांचे नुकसान होणार आहे. त्यामुळे समस्त ओबीसी समाजाच्या सर्व घटकांमध्ये समर्पित बाठीया आयोगाच्या विरोधात रोष व्यक्त करण्यात येत आहे. या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी समता परिषदेच्या वतीने आयोगाच्या कामकाजाच्या निषेधार्थ निदर्शने करण्यात आली. या आंदोलनात काँग्रेस ओबीसी विभाग जिल्हाध्यक्ष प्राचार्य गजानन खरात, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद तालुका अध्यक्ष सचिन कापुरे, शहराध्यक्ष पुरुषोत्तम इरतकर, जिल्हा संघटक श्याम राऊत व इतर जिल्हा कार्यकारिणी सदस्य व समता परिषदेचे लोणार तालुका सदस्य व ओबीसी बांधवांनी सहभाग घेतला होता.

बातम्या आणखी आहेत...