आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गायरान:भूमिहीन गायरान अतिक्रमितांच्या‎ मागण्यांसाठी समता संघटनेचे धरणे‎

बुलडाणा10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

‎ उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार गायरान‎ अतिक्रमण धारकांच्या ताब्यातील जमिनी‎ निष्कासन करण्याच्या आदेशास स्थगिती‎ देण्यासाठी सरकारने न्यायालयात पुनर्विचार‎ याचिका दाखल करावी,यासह इतर‎ मागण्यांसाठी आज, दि २१ नोव्हेंबर रोजी समता‎ संघटनेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर‎ धरणे आंदोलन करण्यात आले.‎ संघटनेने या संदर्भात दिलेल्या निवेदनात‎ नमूद आहे की, भूमिहीन गायरान अतिक्रमण‎ धारकांच्या बाबतीत सरकारने धोरणात्मक‎ निर्णय घेऊन कृषी, निवासी व वाणिज्य‎ प्रयोजनासाठी झालेली अतिक्रमणे‎ नियमानुकूल करण्यात यावीत.

जिल्हास्तरीय‎ समितीकडे प्रलंबित वन हक्क दावे मंजूर‎ करून तत्काळ वन पट्टे वाटप करण्यात यावेत,‎ गोरगरिबांविषयी व्यापक जनहित लक्षात घेऊन‎ सरकारने न्यायालयात पुनर्विचार याचिका‎ दाखल करावी व निष्कासनाबाबत तत्काळ‎ स्थगिती द्यावी, सर्व भूमिहीन मागास, दुर्बल‎ घटकांना न्याय मिळवून द्यावा, अशा‎ मागण्यांचा निवेदनात समावेश आहे.‎ या आंदोलनात समता संघटनेचे‎ जिल्हाध्यक्ष विजय दोडे, नितीन गवई,‎ अाम्रपाल वाघमारे, लक्ष्मण शेजोळ, गजानन‎ जाधव, भारत पैठणे, समाधान अवचार, रमेश‎ गवई, रुपेश जाधव, उत्तम मोरे, भास्कर इंगळे,‎ आशा रमेश मोरे, सुभा वाकोडे, राथाबाई मोरे,‎ कलाबाई वाघमारे यांच्यासह संघटनेचे अन्य‎ पदाधिकारी व महिलांनी सहभाग घेतला.‎

बातम्या आणखी आहेत...