आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मागणी:संभाजी महाराज, राजमाता जिजाऊ, अहिल्यादेवी होळकरांचा राष्ट्रपुरुष यादीत समावेश होणार

बुलडाणा5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राष्ट्रमाता माँ जिजाऊ, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर व छत्रपती संभाजी महाराज यांची नावे राष्ट्रपुरुष थोर व्यक्तींच्या यादीत समाविष्ट करण्यात यावे, अशी मागणी आ. संजय गायकवाड यांनी केली होती. यात यश आले असून लवकरच या यादीत ही नावे समाविष्ट केली जाणार असल्याची माहिती आ. संजय गायकवाड यांनी दिली.

राजमाता माँ जिजाऊ यांनी छत्रपती शिवाजी राजासारखा राजा घडवला व स्वराज्याची स्थापना केली. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी स्वराज्याला मोठा हातभार लावला. छत्रपती संभाजी महाराजांनी परक्रमाच्या जोरावर अल्पकाळातच मराठा साम्राज्याचा विस्तार आणि बचाव केला. मराठा साम्राज्याच्या १५ पट असणाऱ्या मुघल साम्राज्याशी संभाजी महाराजांनी एकहाती लढा दिला. असा पराक्रम करणारा छत्रपती संभाजी महाराज हे एकमेव योद्धे होते. अशा पराक्रमी शूरवीर राजाचा इतिहास आजच्या पिढीला देखील स्मरणात राहणे गरजेचे आहे.

त्यामुळे राष्ट्रपुरुष यादीत छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव नसणे ही अतिशय गंभीर बाब आहे. त्यामुळे छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव या यादीत समावेश करणे अत्यंत गरजेचे आहे, अशी मागणी आ. संजय गायकवाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली होती. याबाबतचे अधिकार राज्य सरकारला नसल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः या विषयात जातीने लक्ष देऊन हा विषय केंद्राकडे पाठवला होता.

तसेच या विषयाचा सतत पाठपुरावा आ. संजय गायकवाड यांनी केला. आ. संजय गायकवाड यांच्या या प्रयत्नाला नुकतेच फलश्रुती मिळाली असून सदरची यादी १८ ऑक्टोबर रोजी राज्य शासनाचे उपसचिव जे. जे. वळवी यांच्या हस्ताक्षराने केंद्र शासनाच्या अंतिम मंजुरीसाठी पाठवण्यात आली असून लवकरच ही नावे राष्ट्रपुरुष थोर व्यक्तींच्या यादीत समावेश केली जाणार आहे.

बातम्या आणखी आहेत...